जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर

निवेदनात पुढे म्हटले आहे की...
१. पंढरपूर ही महाराष्ट्रातील वारकर्यांची वैकुंठनगरी असून श्रद्धास्थान आहे. प्रत्येक वारीला पुष्कळ प्रमाणात भाविकांची उपस्थिती असते. त्या कालावधीत त्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासनाला वारंवार निवेदने द्यावी लागतात.
२. कार्तिकी वारी ही ५-६ दिवसांवर येऊन ठेपली असतांनासुद्धा स्वच्छता, शौचालयांचे नियोजन आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाले नाही.
३. ६५ एकरमध्ये मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपांचे साम्राज्य पसरले आहे, पिण्याच्या पाण्याची टाकी अर्धवट बांधली आहे.
४. नदीपात्राला जोडलेल्या गटारी अनेक निवेदने देऊनही जसेच्या तसे आहेत. प्रदक्षिणा मार्गावरील घाणीचे साम्राज्य आणि अतिक्रमण वाढत चालले आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वारकर्यांना आंघोळीच्या वेळी धोका संभवतो.
५. प्रत्येक घाट आणि परिसरात घाणीचे साम्राज्य अन् दुर्गंधी असून या सर्व गोष्टीचा विचार होऊन वारी कालावधीत पाण्याचे नियोजन, आरोग्य केंद्र, शौचालये, स्वच्छता, घंटागाडी आदी मूलभूत सोयी-सुविधांचा विचार करून वारी चालू होण्यापूर्वी संबंधित विभागाला सर्व सिद्धता करण्याविषयीचे आदेश द्यावेत.
Post a Comment