वासुदेव बळवंत फडके यांच्या
|
पुणे - आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची ४ नोव्हेंबर या दिवशी जयंती होती. त्यानिमित्ताने पतित पावन संघटना, पुणे शहर यांच्या वतीने येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालय येथे असलेल्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाची स्वच्छता करण्यात आली. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाचा जयघोष केला आणि बलिदानाचे स्मरणही केले. या प्रसंगी संघटनेचे पुणे शहराचे सरचिटणीस सर्वश्री मनोज नायर यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वासुदेव बळवंत फडके यांना राज्य गुन्हे अन्वेषण
विभागाच्या पुरालेखागारामध्ये ठेवण्यात आले होते !
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना वर्ष १८७९ मध्ये मध्यरात्री निद्रिस्त असतांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना पुण्यामध्ये असलेल्या सध्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कार्यालयाच्या पुरालेखागारामध्ये (रेकॉर्ड रूम) डांबून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एडन येथे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
Post a Comment