अहेरी / रंगय्या रेपाकवार
अहेरी तालुक्यातील रामय्यापेठा या आदिवासी व नक्षलग्रस्त गावात *हेल्पिंग हॅण्ड्स सामाजिक सेवा संस्था अहेरी* तर्फे गरीबांची दिवाळी साजरी करण्यात आली. या वेळी गरीब आदिवासी कुटुंबातील ६० ते ७० लहान मुलांना व मुलींना नविन कपडे(टी शर्ट,जीन्स पैंट),सर्व प्रकारचे फटाके,फराळ (चिवड़ा,चकली,लाडू,शंकरपाळे),थोर विचारवंतांची पुस्तके आदि वाटप करून व फटाके फोडून गरीबांची दिवाळी साजरी करण्यात आली. फटाके,नविन कपडे व फराळ बघुन सर्वांच्या चेहऱ्यावर खुप आनंद झळकत होता. काहींनी तर आज पर्यंत फराळ बघितला नव्हता असे सांगितले. मागील वर्षी मिरकल या आदिवासी व नक्षलग्रस्त गावात अश्याच प्रकारची गरीबांची दिवाळी साजरी करण्यात आली होती.
गरीबांची दिवाळी साजरी करतांना हेल्पिंग हॅण्ड्स चे प्रतिक मुधोळकर,देवेंद्र खतवार,सतीश डेरकर,गौरव तेलंग,मयूर चांदेकर,राहुल दोंतूलवार,दीपक सुनतकर,जीवन नवले,सूचित कोडेलवार,राजू कोतकोंडावार,पृथ्वीराज कोलावार,धनंजय मंथनवार सह ईतर सदस्य उपस्थित होते. गरीबांची दिवाळी उपक्रमासाठी अहेरिचे श्री.कारूसेठ रोहरा,श्री.राकेशभाऊ गुप्ता(मनोज कृषि केंद्र),पंकजभाऊ नौनूरवार,टगसा राजपुरोहित(हरीओम बीकानेर स्वीट मार्ट),श्री.प्रीतमभाऊ गुंतावार,श्री.संदीपभाऊ जांगिड,रामय्यापेठाचे श्री.दोंतूलवार सावकार सह हेल्पिंग हॅण्ड्स च्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment