BREAKING NEWS

Sunday, November 6, 2016

नगराध्यक्षासाठी सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला - बंडखोरांचे तगडे आव्हान

चांदुर रेल्वेः - (शहेजाद  खान)

चांदूर रेल्वे नगराध्यपदाची निवडणूक

श्री नितीन गवळी 

श्री विनय कडू 

नंदकिशोर  खेरडे 

प्रमोद भाऊ नागमोते 

श्री गणेश रॉय

निलेश सूर्यवंशी 

निलेशभाऊ विश्वकर्मा 


चांदुर रेल्वे नगरपरीषदेच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची निवडणुक होणार असुन या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, भारतीय जनता पार्टी, तिसरी आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षसुध्दा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. यामध्ये सर्वच पक्षांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. या निवडणूकीत बंडखोरांनी अपक्ष उमदेवारी टाकल्यामुळे सर्व पक्षाची डोकेदुखी वाढली असुन चांदूर रेल्वे नगराध्यपदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

यावर्षी नगराध्यक्ष थेट जनतेतुन निवडून द्यायचे आहे. त्यामुळे सर्वच पक्ष लोकाभिमुख चेहरा देण्याच्या प्रयत्नात आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसने माजी नगराध्यक्ष तथा अनुभवी गणेश राॅय यांना उमेदवारी दिली. मात्र मागील ५ वर्ष गणेश रॉय यांनी मौन धारण केले होते. तर राकाॅंचे दमदार युवा नेते विनय कडू यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. पाच वर्षापूर्वी सत्तेची चव चाखणारे व विद्यमान काॅंग्रेस-राकाॅं युतीने अडीच वर्ष हातात हात घालुन अनेक कारनामे केले. त्यांचा फटका नक्कीच राष्ट्रवादी काॅंग्रेसला बसणार आहे. उपाध्यक्ष व सक्रीय नगरसेवक, विरोधी पक्षनेता म्हणुन आपली छाप सोडणारे तिसरी आघाडीचे उमेदवार नितीन गवळी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यांचा मागील कार्यकाळ पाहता त्यांच्या उमेदवारीमुळे चुरस आणखीच वाढली आहे. स्थानिक काॅंग्रेसतर्फे निलेश सुर्यवंशी युवा नव्या चेहऱ्याला संधी दिली. या युवा नवीन चेहऱ्यामुळे  कॉंग्रेसला चांगला फायदा होऊ शकतो. मात्र कॉंग्रेसचे युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन तगडे आव्हान निर्माण केले. तर काॅंग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष अभिजित सराड यांचा चांगला अनुभव शहरवासीयांना असल्याने शहरातील मतदार यावेळी मात्र ताक सुध्दा फुकून पिणार असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपाने शहराध्यक्ष प्रमोद मधुकर नागमोते यांना उमेदवारी दिल्याने भाजपात नवचैतन्य पसरले आहे. शिवसेनेेने स्वप्निल मानकर तरुणाला संधी दिली. मागील पंचवार्षीक निवडणूकीत सेनेला भाजपाची योग साथ मिळाली होती. आता मात्र ती स्थिती राहील का हे मतदार ठरविणार आहे. कधी तळयात, तर कधी मळयात असणारे नंदु खेरडे यांनी अपक्ष म्हणुन आपली उमेदवारी ठेवली असुन ती भाजपा व काॅंग्रेससाठी दुखणे ठरणारी आहे. चांदूर रेल्वे नगराध्यक्ष पदासाठी एकुण आठ उमदेवार निवडणूक रिंगणात असुन पर्यंत उमेदवारी माघार घेण्याचे अंतीम दिवस 11 नोव्हेंबर आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत किती मोहरे निवडणूकीच्या सारीपाटावर राहतात हे येत्या 11 नोव्हेंबरला कळणार आहे..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.