- चित्रविक्रीला वैध मार्गाने निषेध नोंदवण्याचे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांना आवाहन !
- हिंदुबहुल देशात हिंदूंच्या देवता आणि भारतमाता यांचे चित्राद्वारे विकृतीकरण करणे अन् अशा चित्रांची विक्री होणे, हे संतापजनक ! अशी चित्रे विक्री आणि खरेदी करणार्या हिंदूंवर देव कधी कृपा करील का ?
मुंबई - भारतमातेचे नग्न चित्र काढून समस्त भारतियांची राष्ट्रीय भावना दुखवणारे आणि हिंंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे काढून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारे दिवंगत हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांचा येथील सॅफरन आर्ट गॅलरीच्या वतीने ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत saffronart.com या संकेतस्थळावर हुसेन यांची चित्रे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. हुसेन यांच्या चित्रांची विक्री करण्याच्या या धोरणाविषयी अनेक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांनी हिंदु जनजागृती समितीकडे निषेध नोंदवला आहे. या चित्रव्रिकीला वैध मार्गाने निषेध नोंदवावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांना करण्यात आले आहे.
राष्ट्रद्रोही आणि हिंदूंच्या देवतांची अश्लील चित्रे काढल्याच्या प्रकरणी देशभरात हुसेन यांच्या विरोधात १ सहत्र २५० हून अधिक तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. यापूर्वी सप्टेंबर २०१६ मध्ये सॅफरन आर्ट गॅलरीच्या वतीने नवी देहली येथे म.फि. हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने सॅफरन आर्ट गॅलरीच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन हे प्रदर्शन रहित करण्याची विनंती केली होती; मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा सॅफरन आर्ट गॅलरीच्या वतीने म.फि. हुसेन यांच्या चित्रांची अशा प्रकारे ऑनलाईन विक्री करण्यात येत आहे. याविषयी समस्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धर्माभिमानी हिंदु खालील पत्यावर निषेध नोंदवत आहेत.
- पत्रव्यवहारासाठी पत्ता - सॅफरन आर्ट, इंडस्ट्री मनोर, तिसरा मजला, अप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५
- संपर्क क्र. (०२२) २४३६ ४११३, ४३३३ ६२००,
- फॅक्स क्र. (०२२) २४३२ ११८७
- इ मेल : auction@saffronart.com , info@saffronart.com
Post a Comment