![]() |
पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार देतांना सर्वश्री महेश उरसाल आणि संभाजी साळुंखे |
कोल्हापूर - पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १ सहस्र रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एका सुशिक्षित नागरिकाने श्री. मोदी यांच्याविषयी अश्लील वक्तव्य केले होते. या वेळी तेथे समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह उपस्थित होते. एका ध्वनीचित्रफीतीद्वारे ही माहिती ‘व्हॉटस् अॅप’वर उघड झाली आहे. या दोघांच्या विरोधात १४ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता जुना राजवाडा पोलीस ठाणे येथे बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सर्वश्री संभाजी साळुंखे आणि शहरप्रमुख महेश उरसाल यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. या आवेदनात श्री. उरसाल यांनी अश्लील टिपणी करणार्या नागरिकाचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे सर्वश्री शिवाजीराव ससे, धर्माभिमानी राजेंद्र सूर्यवंशी, सुनील पाटील, अवधूत भाट्ये, सुधीर सूर्यवंशी, आकाश नवरुखे आदी उपस्थित होते.
Post a Comment