मुंबई - विद्यार्थ्यांची पटावर नोंद होण्यासाठी शिक्षकांना प्रत्येक आठवड्याला वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत 'सेल्फी' काढून तो 'सरल' या प्रणालीवर 'अपलोड' करावा लागणार आहे, असा निर्णय शिक्षण विभागाने नुकताच घोषित केला आहे. या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनेही विरोध दर्शवला असून निर्णय तातडीने रहित करण्याची मागणी केली आहे.
मनविसेचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अधिवक्ता सचिन पवार म्हणाले की, हा निर्णय म्हणजे शिक्षकांचे काम वाढवणारा आहे. शिक्षकांना विद्यार्थ्यांसमवेत 'सेल्फी' काढण्यासाठी नवे 'स्मार्ट' भ्रमणभाष खरेदी करावे लागतील. राज्यातील बहुतेक शाळा ग्रामीण भागात असल्याने तेथे 'नेटवर्क'ची समस्या आहे. अशा निर्णयाने मराठी शाळांचा दर्जा सुधारणार नाही किंवा गुणवत्तेत भर पडणार नाही. त्यामुळे शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभाग यांनी हा निर्णय रहित करावा.
Post a Comment