BREAKING NEWS

Thursday, November 17, 2016

यवतमाळ येथे सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक !



      यवतमाळ - राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळांची भूमिका काय, या विषयावर १३ नोव्हेंबर या दिवशी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत श्री दुर्गा आणि श्री गणेश या मंडळांचे ७ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी १ डिसेंबरला आयोजित हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने धर्मावर होणार्‍या आघातांना विरोध करण्याचा हिंदुत्वनिष्ठांनी निर्धार केला. 
     समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी सार्वजनिक उत्सव मंडळे कशा प्रकारे सेवा करू शकतात, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे गैरप्रकार रोखून छत्रपती शिवरायांप्रमाणे धर्माच्या नावावर संघटन करण्याचे आवाहनही केले. या बैठकीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये संस्कृती रक्षण मोहीम राबवणे, ३१ डिसेंबर साजरा करण्याचा विरोध करणे, तसेच पंधरा दिवसांनी एकदा बैठक घेणे, असे ठरवण्यात आले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.