शिवमोग्गा - कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा येथे जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर ६ नोव्हेंबरला आंदोलन केले. या आंदोलनात अण्णा हजारे समिती, ब्लॅक बॉईज फ्रेन्ड्स क्लब, शिवप्पा नायक अभिमानी बळगा, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना सहभागी झाल्या होत्या.
हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रसन्ना कामत, सनातन संस्थेच्या सौ. सौम्या मोगेर यांनी आंदोलनाला संबोधित केले.
क्षणचित्रे : १. प्रत्येक महिन्यात आंदोलनासाठी अनुमती घेतांना अर्ध्या किंवा एका दिवसात अनुमती मिळत होती. टिपू जयंतीच्या विरोधातील आंदोलनासाठी अनुमती मिळवण्यासाठी बर्याच हेलपाट्या घालाव्या लागल्या. तीन दिवस प्रयत्न करूनही अनुमती मिळाली नव्हती. आंदोलनाच्या एक दिवस अगोदर अनुमती मिळाली.
२. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांनी संपूर्ण आंदोलनाचे ध्वनीचित्रिकरण केले. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. प्रसन्ना कामत, सनातन संस्थेच्या सौ. सौम्या मोगेर यांनी आंदोलनाला संबोधित केले.
क्षणचित्रे : १. प्रत्येक महिन्यात आंदोलनासाठी अनुमती घेतांना अर्ध्या किंवा एका दिवसात अनुमती मिळत होती. टिपू जयंतीच्या विरोधातील आंदोलनासाठी अनुमती मिळवण्यासाठी बर्याच हेलपाट्या घालाव्या लागल्या. तीन दिवस प्रयत्न करूनही अनुमती मिळाली नव्हती. आंदोलनाच्या एक दिवस अगोदर अनुमती मिळाली.
गदग येथेही निदर्शने
लक्ष्मेश्वर - गदग जिह्यातील लक्ष्मेश्वर येथे हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी या संघटनांच्या वतीने ५ नोव्हेंबरला निदर्शने करण्यात आली. या वेळी बोलतांना श्रीराम सेनेचे लक्ष्मेश्वर शहर अध्यक्ष श्री. प्रकाश मदलूर यांनी मुसलमान समुदायाच्या एकगठ्ठा मतांसाठी राज्य सरकारकडून टिपू जयंती साजरी करण्यात असल्याचा आरोप केला. टिपू सुलतानने अनेक हिंदूंचे धर्मांतर केले. त्याने हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त केली, असे धर्माभिमानी श्री. प्रेम शेट यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. शोभा इटगी आणि रणरागिणीच्या कुमारी स्फूर्ती यांचेही भाषण झाले. या वेळी ३५ धर्माभिमानी उपस्थित होते. या वेळी टिपू सुलतान जयंती उत्सव रहित करण्याची मागणी करणारे एक निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले.
Post a Comment