BREAKING NEWS

Monday, November 7, 2016

विविध मागण्यासाठी तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन - चांदूर रेल्वे एसडीओ कार्यालयसमोर केले आंदोलन

शहेजाद खान /--
चांदूर रेल्वेः- 



आॅन लाईन 7/12 मधील त्रुटी दूर करण्यासाठी, शेतकऱ्यांना आॅनलाईन 7/12 वेळेत मिळण्यासाठी,
नागरिकांना फेरफार नोंदी मुदतीत होण्यासाठी, आॅनलाईन मुळे शेतकऱ्याला  तलाठी कार्यालयात माराव्या
लागणाऱ्या  चकरा थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या वतीने
तलाठी व मंडळ अधिकारी यांचे स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर एक दिवशीय धरणे आंदोलन
करण्यात आले
तलाठी सजांची व महसुल मंडळाची पुनर्रचना व मंडळ अधिकारी कार्यालयाचे भाडे देण्यात यावे, 7/12
संगणीकरण व ई फेरफार मधील अडचनी (साफ्टवेअर दुरूस्ती,सव्र्हरची स्पिड, नेट कनेक्टीव्हीटी इ.),
तलाठी/मंडळ अधिकारी यांना पायाभुत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातुन तलाठी संगर्वास
वगळणे, तलाठी कार्यालय बांधुन देणे, मंडळ अधिकारी कार्याजल बांधुन देणे, महसुल खात्यात पदोन्नतीसाठी
व्दिस्तरीय पध्दतीचा अवलंब ठेवणे, सरळ सेवेची 24 टक्के पदे खात्यातंर्गत कर्मचार्यांसाठी  राखुन ठेवणे,
अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करणे व जुनी योजना सुरू करणे, अव्वल कारकुन संवर्गातील पदे मंडळ
अधिकारी संवर्गातील कर्मचार्यांमधून व मंडळ अधिकारी संवर्गातील पदे अव्वल कारकुन संवर्गातून भरणे बाबत,
मंडळ अधिकारी यांच्या वेतन श्रेणी बाबत विचार करणे इत्यादी मागण्यासाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
शासनाला मंडळ अधिकारी/तलाठी यांच्या न्याय मागण्यांसाठी यापूर्वी 3 ते 5 नोव्हेंबर काळात काळ्या फिती
लावुन कामकाम केले. त्यानंतर सोमवारी राज्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय
धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर येत्या 10 नोहेंबर  पासुन संगणीकृत कामकाजावर बहिष्कार टाकुन
डिएससी व अतिरिक्त कार्यभार तहसीलदार यांच्याकडे जमा करण्यात करणे, 10 ते 14 नोव्हेंबर 2016 या
कालावधीत पालकमंत्री विरोधी पक्षनेते, खासदार व आमदार यांना आंदोलनाची माहिती देऊन निवेदन देणे, 16
नोव्हेंबर पासुन सर्व तलाठी/मंडळअधिकारी सामुहिक रजेवार जाणार आहे. या आंदोलनात मंडळ अधिकारी
संघटनेचे अध्यक्ष शेषराव लंगडे, अमोल देशमुख, अनिल चैरे, दिलीप इंगळे, तलाठी योगेश वंजारी, अरविंद
सराड, निलेश लांजेवार, विक्रांत वानकर, नितीन धोटे, प्रफुल्ल नांदने, रहिम पठाण, चेतन तामगाडगे, विलास
गोळे, राहुल भिलकर, सुनिल भांगे, कमलकिशोर गाठे, प्रल्हाद पल्ले, राजेश मलमकर, ज्ञानेश्वर चिखलकर,
डि.के. पुसदकर, स्वप्निल देशमुख, मेघा वाघेला, आरती कनोडीया, दीपाली जाधव यासह सर्व मंडळ अधिकारी
व तलाठी सामील झाले होते

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.