चांदूर रेल्वेः/ शहेजाद खान /---
महाराष्ट राज्य ग्रामसेवक युनियन डिएनई 136 यांनी आपल्या प्रलंबित न्याय मागण्यासाठी असहकार आंदोलन सुरू केले असुन या आंदोलनाचा भाग म्हणुन आज ;ता.7) स्थानिक पंचायत समिती कार्यालयसमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
कंत्राटी ग्रामसेवकांचा 3 वर्ष सेवा काळ नियमित करणे, सोलापुर जिल्हयातील 239 ग्रामसेवकांवरील चुकीची कारवाई रद्द करणे व 39 निलंबीत ग्रामसेवकांना सेवेत पुनस्र्थापित करणे, ठाणे जि.प.मार्फत ग्रामसेवकावरील केलेली चुकीची कारवाई रद्द करणे, वर्धा जिल्हयातील ग्रामसेवकांवर झालेल्या चुकीच्या फौजदारी केसेस मागे घेणे, ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना दरमहा प्रवास भत्ता पगाराबरोबर 3 हजार देणे , ग्रामसेवक संवर्गाची शैक्षणिक अर्हता बदल करणे, सन 2011 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांचे पदे निर्मित करणे, ग्रामसभेची संख्या मर्यादित असावी व इतर यंत्रणा ग्रामसभा सचिव बदल होणे व ग्रामसभा सुधारणा होणे, नरेगा करीता स्वतंत्र यंत्रणा करण्यात यावी, ग्रामसेवक संवर्गासाठी वैद्यकिय कॅशलेस सुविधा देण्याची निर्णय घेण्यात यावा, राज्यस्तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा करण्यात यावा, 12 जुन 2013 चे विना चैकशी फौजदारी केसेस परिपत्रक मागे घेणे, विस्तार अधिकारी 20 ग्रामपंचायत करिता पदनिर्मिती होणे, समाज कल्याण विस्तार अधिकारी पदे भरणे, केंद्र पुरस्कृत विस्तार अधिकारी पद निर्मिती होणे, सन 2015 नंतर सेवेत ग्रामसेवकांना जुनी पेंशन योजना लागु होणे व डिसीपिएस हिशोब स्लिपा सर्वांना जि.प मार्फत मिळणे, ग्रामसेवक संवर्गाचा सुधारित जाॅब चार्ट तयार होणे, राज्यातील निलंबीत ग्रामसेवकांना प्राधान्य क्रमाने पुनस्र्थापित करणेबाबत कालबध्द कार्यक्रम होणेबाबत, राज्यभर होणारे ग्रामसेवकावर हल्ले, मारहाण, खोटया केसेस याबाबत सेवा संरक्षण व सरकारी कर्मचारी मारहाण गुन्हा अजामिनपात्र करणे आदी प्रलंबित मागण्यासाठी ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन सुरू केले असुन यातील पहिला टप्पा म्हणुन आज राज्यभरातील सर्व पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले. तर यापुढे 11/11/2016 ला राज्यातील सर्व जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 15/11/16 ला राज्यातील 6 विभागीय आयुक्त कार्यालय समोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतर 17/11/2016 ला संपूर्ण राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असुन ग्रा.पं. कार्यालयाच्या चाव्या व शिक्के गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल, दररोज धरणे आंदोलन प्रलंबित प्रश्न सुटेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार आहे. तर येत्या हिवाळी अधिवेशनात 15 हजार ग्रामसेवकांचा विधानसभेवर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. या एक दिवशीय धरणे आंदोलनात म. रा. ग्रामसेवक युनियन चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष सुनिल केने, सचिव दिनेश मोहोड, रश्मी कढाणे, निलेश आष्टीकर, निलेश पवार, भाष्कर गिद, आर.एन.धाकडे, आर.आर.राठोड, वि.बी.गुडधे, व्हि.टी.मडघे, एन.आर.ढोक, सतिश गवई, निलेश वाघ, किशोर पांडे, रेखा खवडे, नरेंद्र पवार, विलास ढेंमरे, चरणदास बनसोड, नरेंद्र धानके, राजेंद्र वाकोडे, गजानन काळमेघ, निलेश शिंदे, चंद्रकांत भटकर, मझहर अली खान यासह सर्व ग्रामसेवक उपस्थित होते.
Post a Comment