अमरावती- विदर्भ24न्यूज /विशेष प्रतिनिधी /-
निवडणूक नगरपालिकेची
प्रतिष्टा नगराध्यक्ष पदाची
सोशल मिडिया वर सुरु असलेला प्रचार |
जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील नगर परीषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी पक्षांसह तिसरी आघाडी व अपक्ष उमेदवार निवडणुक मैदानात उतरले आहे. मात्र तिसऱ्या आघाडीचे नितीन गवळी यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मोठे आव्हान दिले आहे. त्यांनी शिट्टी हे चिन्ह घेवुन प्रचारात उडी घेत प्रचारात शेवटच्या दिवशीही आघाडी घेतली आहे. चांदुर रेल्वे नगरपरीषदेच्या विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सोशल मीडियावर तिसऱ्या आघाडीचे नितीन गवळी यांच्या विजयाचा दावा काही शहरवासीयांकडुन केला जात आहे.
ही मोबाईल इंटरनेटवर सक्रिय आहे. अनेक निवडणुकीत अनेक राजकीय पक्षांची तरुणाईवरच मदार होती. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय
पक्षांनी तसेच अपक्ष, तिसऱ्या आघाडीने आपला प्रचार करण्याकडे भर दिला होता. या निवडणुकीत कोण निवडुन येणार हे प्रचाराच्या अंतिम दिवसापर्यंत याबाबतचे युद्ध सद्यःस्थितीत सोशल मिडीयावर पाहण्यास मिळत आहे. याच चर्चेने फेसबूक, व्हॉटसऍपचे रकाने भरलेले
दिसत होते. व्हॉटसऍप आणि फेसबूक सारख्या सोशल मीडियावर चांदुर रेल्वे नगरपरीषदेमध्ये तिसऱ्या आघाडीचे नितीन गवळी यांच्या विजयाचा दावा अनेकांकडुन केला जात आहे. तसेच सोशल मिडीयावर नितीन गवळींना युवकांचा वाढता प्रतिसाद सुध्दा मिळत आहे. मात्र चित्र स्पष्ट दोन दिवसानंतर होणारच आहे.
Post a Comment