BREAKING NEWS

Saturday, November 26, 2016

नोटबंदी निर्णयाविरोधात भारत बंद ला जनता दल (से.) चा जाहीर पाठिंबा - बंदमध्ये कार्यकर्त्यांना सामिल होण्याचे आवाहन

चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-



केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदीच्या नावाखाली शेतकरी व सर्वसामान्यांचा छळ चालविला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठविला असून सर्वच विरोधी पक्षांनी २८ नोव्हेंबर रोजी
आक्रोश दिन पाळण्याचे ठरविले आहे. या
दिवशी संपूर्ण देशभर मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आक्रोश केला जाईल. या बंदला महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चा जाहीर पाठिंबा असुन या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी सामिल होण्याचे आवाहन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोलेंनी केले आहे.
    देशभर या नोटाबंदीच्या निर्णयामुळे हाहाकार माजला आहे. लोकांचा जीव जातो आहे. अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे. लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे, संताप आहे. त्यांच्या या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्यात तसेच सरकारला जागे करण्यासाठी विरोधी पक्षांतर्फे उद्या भारत बंद ठेवण्यात येणार आहे. नोटाबंदीमुळे देशभरात आर्थिक अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा निर्णय काळ्या
पैशाविरुद्धच्या लढाईचा एक भाग असल्याचा दावा सरकार करीत असले तरी त्यामुळेससर्वसामान्य जनताच वेठीस धरली गेली आहे. हा निर्णय पुरेशा तयारीविनाच राबविल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा निर्माण होऊन दैनंदिन व्यवहार बाधित झाले आहेत. रब्बीची पेरणी, लग्नसराई, व्यापार-
उदीम, वैद्यकीय उपचार आदी महत्त्वाची कामे
अडचणीत आली आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या भारत बंदला महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) चा जाहीर पाठिंबा असुन या बंदमध्ये कार्यकर्त्यांनी सामिल होण्याचे आवाहन जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोलेंनी केल्याचे जनता दल कार्यालयीन सचिव संजय डगवार यांनी प्रसिध्दीपत्रकातुन कळविले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.