पॅरिस (फ्रान्स) -
जगभरात प्रत्येक साडेचार दिवसांनी एका पत्रकाराची हत्या होते, असे युनेस्कोच्या महासंचालकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. गेल्या १० वर्षांमध्ये ८२७ पत्रकारांची कामावर असतांना हत्या झाल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. सिरीया, लिबिया, इराक, येमेन यांसह अरब राष्ट्रे पत्रकारांसाठी सर्वांत वाईट क्षेत्र ठरले आहे. तसेच दक्षिण अमेरिकेतही पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप वाईट स्थिती आहे. २००६ ते २०१५ या १० वर्षांच्या कालावधीत झालेल्या एकूण ८२७ हत्यांपैकी ५९ टक्के हत्या गेल्या २ वर्षांमध्ये झाल्या आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिका येथेही पत्रकारांच्या हत्या होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. गेल्या एका वर्षात या भागात ११ पत्रकारांच्या हत्या झाल्या. विदेशी पत्रकारांच्या तुलनेत स्थानिक पत्रकारांना अधिक धोका असतो, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

Post a Comment