BREAKING NEWS

Thursday, November 17, 2016

मतदारांना हवे भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, स्वच्छ पाणी, पथदिवे व शिक्षण - नव्या नगराध्यक्षांकडुन अपेक्षा.. कॉंग्रेस- राष्ट्रवादी सत्ताधार्‍यांकडून निराशा

चांदूर रेल्वे- (शहेजाद खान )-                     

Displaying Nagar Parishad.jpg

नगर परिषदेची निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तसतसे मतदारांमधे चर्चेला उधान येत आहे. नगराध्यक्ष कसा असावा, याबाबत सर्वत्र चर्चा सुरु असून स्वच्छ पाणी, प्रकाशमान पथदिवे व दज्रेदार शिक्षण एवढी माफक अपेक्षा महिला व पुरुष मतदारांची असल्याची चर्चा आहे. या मुलभूत गरजाही मागील कॉंग्रेस- राष्ट्रवादी नगराध्यक्ष पूर्ण करू न शकल्याने मतदारांमधे निराशा दिसून येत आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये शहरातील जनतेने ३ नगराध्यक्ष अनुभवले. शहरात पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची नविन व अद्यवत यंत्रणा नाही. त्याच परंपरागत तुरटीच्या भरवशावर पाणी स्वच्छ व शुद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारागिर कर्मच्यार्‍यांचा अभाव व कंत्राटी ठेकेदार यांच्या भरवशावर शहराचा पाणीपुरवठा सुरु आहे. त्याची कुठलीही अद्यवत स्थिति आजपर्यंत नगरसेवकांनी जाणून घेतलेली नाही. त्यामुळे अशुद्ध व हिरवट रंगाचेच पाणी शहराने वापरले. पथदिव्यांसाठी मागील अडीच वर्षात नगरपालिकेत खूप गोंधळ उडाला होता. शहराला चकचकित करण्यासाठी काँग्रेसच्या नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी धाडसी निर्णय घेत एलईडी लाईट शहरात बसविण्याचा करार कंपनीसोबत केला होता. पण त्यांच्याच नगरसेवकांच्या अंतर्गत कलहामुळे अग्रवाल यांना मनस्ताप होऊन राजीनामा द्यावा लागला.

शहरात पथदिव्यांवर लाखो रुपये खर्च होऊनही शहर रात्री अंधारातच असल्याचे चित्र मागील पाच वर्ष पाहायला मिळाले. मागील पाच वर्षात नगर परिषद शाळेत भौतिक व शैक्षणिकरित्या कुठलाही बदल नगर परिषद प्रशासनाकडून झाला नाही. जो थोडा फार शैक्षणिक बदल झाला तो शिक्षकांमुळे. नगर परिषदेतील आपसी राजकारणामुळे मागील वर्षी क्रीडा स्पर्धाच रद्द करावी लागली.पालिकेच्या प्रशासनावर कुठल्याही नगरसेवक व पदाधिकारी यांचे लक्ष नसल्याने शिक्षकांवर प्रभार देतच नगर परिषदेच्या शाळा चालत रहिल्या. मागिल वर्षात केवळ तिसऱ्या आघाडीचे नगरसेवक नितीन गवळींनी शाळेच्या भौतिक समस्या मांडल्या. पण नगराध्यक्षांनी त्याकडे दुर्लक्षच केल्याने आजही बाजारातील नेहरू शाळा अडचणीत आहे. एकीकडे सर्वच शाळा भौतिक व शैक्षणिक दृष्टया समृद्ध होत असताना नगर परिषद शाळा मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रगतीपासून दूरच असल्याचे चित्र आहे. या शिवाय पादचार्‍यांच्या समस्या जैसे थे आहेत. जुन्या स्टँडवरील फळविक्रेत्यांचे अतिक्रमण व रस्त्याच्या मधोमध येण्यासाठीची स्पर्धा या प्रकाराकडे जाणून बुजून किंवा व्होट बँक म्हणून पाहत नगरपरिषदेतील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचेही बोलल्या जात आहे. या व अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी दमदार व स्वतंत्र विचार शैलीचा नगराध्यक्ष हवा, अशी चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला येत आहे. निवडणूक जवळ येत असताना प्रत्येक पक्षांनी सक्षम उमेदवारापेक्षा निवडून येणाराच उमेदवार कोणता याला प्राधान्य देत उमेदवारी दिल्याचीही चर्चा शहरात आहे. पक्ष प्रमुखांनी त्यांचा जागी त्यांचे काम केले असले तरी आता मतदारांना त्यांचा सेवक कसा असावा, हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, हे विशेष..

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.