पुणे--
रामजन्मभूमीच्या आंदोलनासाठी कित्येक रामभक्तांनी बलीदान दिले असून ते व्यर्थ जाता कामा नये. प्रभु श्रीरामचंद्रांच्या कृपेने रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर अवश्य बनेल. जगातील कोणतीही शक्ती मंदिर बनवण्यापासून आम्हाला थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन बजरंग दलाचे अखिल भारतीय संयोजक राजेश पांडेय यांनी केले. रामजन्मभूमी आंदोलनातील हुतात्मा कारसेवकांच्या स्मृतीदिनानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल पुणे महानगरच्या वतीने ६ नोव्हेंबर या दिवशी शहरातील विविध ठिकाणी रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. सिंहगड रस्त्यावरील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संगप्रमुख श्री. दादा वेदक, श्री. अतुलशास्त्री भगरेगुरुजी, आमदार भीमराव तापकीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्र वंजारवाडकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

क्षणचित्रे
१. रक्तदान मोहिमेत ४५० हून अधिक नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
२. या उपक्रमात ८ रक्तपेढ्या आणि ७५ हून अधिक स्थानिक गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती.
Post a Comment