BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

पल्स पोलिओ लसीकरण  मोहिम – २०१७ पहिले सत्र 29 जानेवारी रोजी

मोईन खान /-
        परभणी /-: 




राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-२०१७ अंतर्गत २९ जानेवारी २०१७ रोजी पहिले सत्र तर २ एप्रिल २०१७ रोजी दुसरे सत्र राबविण्यात येणार आहे. परभणी जिल्हयात ग्रामीण, शहरी व महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

        पल्स पोलिओ लसीकरण मोहिम- 2017 संदर्भात जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ जावेद अथर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ व्हि आर मेकाने, डाॅ कल्पना सावंत, डा काझी, डाॅ कालिदास चौधरी तसेच संबंधित विभाग व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल म्हणाले, पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-2017 अंतर्गत जिल्ह्यातील एकही लाभार्थी बालक या लसीवाचून वंचित राहू नये यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांनी मोहिम कालावधीत आपापल्या मुख्यालयी हजर राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री महिवाल यांनी दिले.    

        नियमित लसीकरण कार्यक्रमाचे बळकटीकरण करण्यासाठी विशेष लसीकरण सप्ताहाचे  आयोजन करण्यासाठी जिल्हास्तरावर तयार करण्यात आलेल्या सूक्ष्म कृती आराखडयाचा विचार  करुन स्थलांतरीत/भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे जिल्हा स्तरावरील कृतीनियोजनः-

अपेक्षीत लाभार्थी (० ते ५ वर्ष) ग्रामीण-  १३८६४६,शहरी- ४१२७५, मनपा- ५४०००,

जिल्हा एकुण- २३३९२१, बुथ केंद्र संख्या:- ग्रामीण- १०४६,शहरी- १३८, मनपा- २१०,

जिल्हा एकुण- १३९४, उपलब्ध मनुष्यबळ:- ग्रामीण- २८७४, शहरी- ४०२, मनपा- ६३०,

जिल्हा एकुण- ३९०६,टीमची संख्या:- ग्रामीण- १५३४,शहरी- ७४,मनपा- १००,

जिल्हा एकुण- १७०८, लागणारी लस:-ग्रामीण- १८४३९९,शहरी- ५४८९५,मनपा- ७४४८०,

जिल्हा एकुण- ३१३७७४, लस व्हायल्समध्ये:-ग्रामीण- ९२२०,शहरी- २७४५,मनपा-३७२४,    जिल्हा एकुण- १५६८९,

        पल्स पोलिओ मोहिम झाल्यावर एक दिवसाचा खंड देवून लगेच आय पी पी आय मोहिम  ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस राबविण्यात येणार आहे. (आय पी पी आय मोहिम ग्रामीण भागात दिनांक ३१ जानेवारी,१ व २ फेब्रुवारी रोजी  तसेच शहरी भागात ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७) या कालावधीत राबविण्यात येणार आहे. आय पी पी आय मोहिमेत कर्मचा-यांमार्फत घरोघरी भेटी नियोजन करतांना एकही बालक लसीकरणापासून  वंचित राहणार नाही अशा दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

        मोहिमेच्या अनुषंगाने वैद्यकिय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालये/ग्रामीण रुग्णालये, तालुका आरोग्य अधिकारी, प्रभारी वैद्यकिय अधिकारी, जिल्हास्तरीय अधिकारी, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक  यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर द्वितीय वैद्यकियअधिकारी व कर्मचारी,आशा,अंगणवाडी कार्यकर्ती,यांचे प्रशिक्षण वैद्यकिय अधिका-यांमार्फत व जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत घेण्यात येत आहे. तालुकास्तरीय समन्वय समितीच्या बैठकाही घेण्यात आहेत. मोहिमेच्या प्रसिध्दीकरीता सिनेमागृहामध्ये  स्लाईड शो प्रदर्शित करणे, आकाशवाणीवरुन जिंगल्स देणे, विविध स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.