BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती क ची मासीक सभा सभापती स.समी स. साहेबजान उर्फ माजूलाला यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मोईन खान / परभणी  : -


परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती (क) ची मासीक सभा सभापती स.समी स. साहेबजान यांच्या अध्यक्षेतेखाली सुरू करण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त मीर शाखेर अली यांच्या उपस्थितीमध्ये मासिक सभा दि.13 डीसेंबर रोजी कल्याणमंडपम येथे घेण्यातआली.

मासिकसभा दि.5/10/2016 रोजी मासिक सभा तहकुब करण्यात आली होती. ती मासिक सभा आज दि.13 डिसेंबर 2016 रोजी दु.3ः00 वाजता सुरू करण्यात आली. मागील विषयावर चर्चा करण्यात आली. या विषयावर सभागृहाने 1 मताने मंजुरी दिली.

विषय क्रं.13 प्रभाग समिती क अंतर्गत स्वच्छतेच्या कामाबद्दल चर्चा व निर्णय घेण्यासंदर्भात.

सभागृहात मेराज खुरेशी, आकाश लहाणे, विजय धरणे, विश्‍वजीत बुधवंत, सौ.मिराताई शिंदे, श्रीमती.खाजा, यांनी सभागृत स्वच्छतेविषयी सभागृहामध्ये स्वच्छता होत नाही. स्वच्छता निरीक्षक आशोक स्वामी, राजु झोडपे यांनी कर्मचारी कमी असल्यामुळे साफसफई होत नाही. या  विषयावर विश्‍वजीत बुधवंत, श्रीमती खाजा यांनी प्रत्येक प्रभागात स्वच्छता कामगार 6 देण्यात यावेत. या विषयावर विजय धरणे, सोै. मिराताई शिंदे, आकाश लहाणे, यांनी रोज सकाळी  5ः30 वाजता स्वच्छा कामगार कामावर येतात का व्हॉटसाफ च्या ग्रुपवर हजेरी घेतेवेळेसचे फोटो टाकावेत. या विषयावर सभागृहात सभापती समी उर्फ माजुलाला यांनी सभागृहात स्वच्छता कामगारासंदर्भात आयुक्त राहूल रेखावार यांनी दिलेलया आदेशाप्रमाणे 500 मी. नाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्या प्रमाणे काम करून घ्यावे. तसेच स्वच्छता कामगाराची हजेरी सकाळी 6ः30 वाजता घेण्यात यावी सकाळी 11ः00 वाजेपर्यंत काम घ्यावे दुपारी 2 नंतर ज्या प्रभागामध्ये अतिआश्यक स्वच्छाता करायची आहे त्या प्रभागात स्वच्छता कराण्यात यावी. तसेच येत्या 8 दिवसात स्वच्छता करीवी नसता 8 दिवसानंतर स्वच्छा निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात येतील असे सुचविले.

विषय क्रं, 14 प्रभाग क समिती अंतर्गत विद्युत व्यवस्थेबाबत चर्चा या विषयावर सभागृहात मेराज खुरेशी यांनी शहरामध्ये गेल्या दिड ते दोन महिन्यापासून गणपती, देवी, व दिवाळी, या निमित्त शहरामध्य लाईट बंद होते. अद्यापही शहरामध्ये लाईट लागले नाहीत. त्वरीत प्रभाग समिती  अंतर्गत लाईटची खरेदी करा व ज्या प्रभागामध्य लाईट बंद आहेत. त्या प्रभागात लाईट लावण्यात यावेत. या विषयावर लाईट विभागाचे प्रमुख शिंदे यांनी लाईटचे मटेरियल नसल्यामुळे, लाईट लावण्यात आले नाही. आता काही दिवसाता लाईटचे सामान उपलब्ध होणार आहेत ते आपल्या प्रभागात लावण्यात येतील. या विषयावर सभागृहात सौ. मिराताई शिंदे. विजय धरणे, विश्‍वजीत बुधवंत,यांनी विद्युत विभागात किती लेबर लावले व काय काम करतात याचा तपशील द्याव. या विषयावर सहाय्यक आयुक्त मिर शाखेर अली खाजगी कामगार मेन्टनन्सचे काम करतात अशी माहिती देण्यात आली.

विषय क्रं. 15 प्रभाग समिती क  अंतर्गत हतपंप दुरूस्ती व गळती दुरूस्ती या विषयावर चर्चा

सभागृहामध्ये मेराज खुरेशी, श्रीमती खाजा, आकाश लहाणे,यांनी सभागृहामध्ये हातपंप किती दुरूस्ती केले. या विषयावर जालींदर कांबळे यांनी शहरामध्ये 10 ते 12 हातपंप्प दुरूस्त केले, व येत्या आठ दिवसात उर्वरीत हातपंम्प दुरूत करण्यात येतील असे सांगितले. गळती दुरूस्ती बाबत सभागृहामध्ये सर्व सन्मानीत सदस्यांनी कॉलणी अंतर्गत गळती दुरूती करण्यास सांगितले. या विषयावर सभागृहात सहाय्यक आयुक्तांनी शहरामध्ये पाईपलाई गळती दुरूस्तीचे काम युध्द पातळीवर चालू आहे इक्बाल नगर, धार रोड, ममता कॉलणी या परिसरात लिकेज काढण्या आले आहे अशी माहिती सभागृहामध्ये देण्यात आली आहे. या विषयावर सभागृहात सभापती समी उर्फ माजुलाला यांनी प्रभाग समिती क अंतर्गत नागरीकांना मुलभूत सुविधा देण्याणार. शहरातील लाईट, पाणी, स्वच्छता करण्यासाठी आदेश सर्व अधिकार्‍यांना दिले आहेत त्याची आमलबजावणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात मासिक सभा घेणार असे सभागृहात सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.