BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही ! - श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, भाजप

कल्याण (जिल्हा ठाणे) येथे सळसळत्या भगव्या वातावरणात 
‘हिंदु महामण्डलम्, कल्याणच्या वतीने आयोजित धर्मजागरण सभा !


हिंदु धर्मजागृती सभा विशेष ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत !


श्री. राजासिंह ठाकूर
     कल्याण - १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे स्थान आहे. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही, असे प्रतिपादन गोशमहल, तेलंगण येथील भाजपचे आमदार तथा श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराचा (नौदलाचा) आरंभ कल्याणनगरीतून केला. हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याणनगरीत लाल चौकी येथील नमस्कार मंडळाच्या पटांगणात ‘हिंदु महामण्डलम्’च्या वतीने धर्मजागरण सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर जैन मुनी पू. निलेशचंद्र विजयजी, ‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट’चे राष्ट्रीय अध्यक्ष पारस राजपूत, बहेन दुर्गा डिफेन्सच्या संस्थापिका सौ. मंजुश्री वरादी, विश्‍व हिंदु सेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत शासनाच्या महिला अन् बालकल्याण मंत्रालयाचे सदस्य श्री. रविंद्र द्विवेदी उपस्थित होते. हिंदु धर्म आणि संस्कृती अबाधित राखण्याच्या संकल्पाने सभेचा आरंभ करण्यात आला. या सभेला १ सहस्र ५०० धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.
     श्री. राजासिंह ठाकूर या वेळी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गाय कापणार्‍या कसायांचे हात छाटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास प्रत्येक तरुणाने वाचायला हवा. शिवाजी जन्मावा; पण शेजारी अशी सध्याच्या मातांची मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूशी गनिमीकाव्याने लढले. आज प्रत्येक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. जे लढतात त्यांचाच इतिहास घडतो. धनंजय देसाई यांच्यासारखे हिंदूंचे नेते देव, देश आणि धर्म यांविषयी बोलले म्हणून कारागृहात आहेत. करागृहात असलेले निरपराध हिंदुत्वनिष्ठ नेत्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती पूर्ण प्रयत्न करत आहे. तरीही या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने सर्वांनी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा देवाकडे त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करूया. सिमी या आतंकवादी संघटनेने ‘लव्ह जिहाद’ चालू केला आहे. हिंदु मुलींना याविषयी सतर्क करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मनात ठेवून पुढे जायचे आहे आणि धर्मरक्षणाचे कार्य करायचे आहे. देशात आतंकवादी मारले गेल्यानंतर गळा काढणारा आणि दंगलींमध्ये हिंदूंच्या विरोधात उभा रहाणारा एम्आयएम् हा देशद्रोही पक्ष आहे. अशा देशद्रोही पक्षावर बंदी घालायला हवी. जे ‘भारत माता की जय’ म्हणणार नाहीत त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही.’’ या वेळी श्री. राजासिंह ठाकूर यांनी उपस्थितांना उभे रहाण्यास सांगून धर्मरक्षणाचे कार्य करण्याविषयी प्रतिज्ञा म्हणवून घेतली. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.