नवी दिल्ली: -

महाराष्ट्रातील नागपूर अधिवेशनादरम्यान होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी विशेष रेल्वे देण्याचे आदेश रेल्वेमंत्री श्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. 2 दिवसांनी 14 डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चासाठी आयोजकांनी पैसे भरुन स्पेशल ट्रेनची मागणी केली होती. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. वाशिम व Mumbai श्री छत्रपति शिवाजी टर्मिनस अशा दोन ठिकाणाहून या ट्रेन निघणार असून, त्यासाठी रेल्वेच्या तारखा आणि वेळेचं नियोजनही सुरु झालं आहे.
Post a Comment