चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )-
कोणी चहा, कॉफी सारख्या कैफीनयुक्त पदार्थांचा अधिक उपयोग करत असेल, नियमीत, धुम्रपान किंवा दारुपान करत असेल, किरकोळ अपघात किंवा पडल्याने हाड मोडले असेल, दिर्घकाळापासुन पाठीच्या दुखण्याचा त्रास असेल तर ते ऑस्टीयोपोरोसीस आजाराच्या काठावर उभे आहे. या रोगविकारामुळे हाडे कैल्शिअम व व्हीटैमिन डी च्या कमतरतेमुळे ढिसुळ व कमजोर होतात. त्यामुळे ऑस्टीयोपोरोसिस या रोगाचे अत्यंत आधुनिक व कॉम्प्युटराईस मशिनव्दारे केल्या जाते. यासाठी शहरातील लॉयन्स क्लब तर्फे आज ४ डिसेंबर रोजी स्थानिक ढोले हॉस्पीटलमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ च्या दरम्यान ऑस्टीयोपोरोसिस निशुल्क तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ढोले हॉस्पीटलमध्ये आज आयोजीत शिबीरामध्ये हाडामध्ये कैल्शिअमची कमतरता तसेच हातापायामध्ये मुंग्या येणे याची अत्याधुनिक कॉम्प्युटराईज मशिनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीची फी ८०० ते १००० रूपये असुन या शिबीरात मात्र विनामुल्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कंबर दुखी, गुडघ्यांचा त्रास, फ्रैक्चर, पाठ दुखी, संधीवात, हातपाय थरथर कापणे, हातापायामध्ये अंगार होणे यांपैकी कोणतेही लक्षण असल्यास शिबीरात तपासणी होणार आहे. तरी या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांनी घेण्याचे आवाहन लॉयन्स क्लब इंटरनैशनल, चांदुर रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment