अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर |
सातारा- वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘अधिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार’ हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना जाहीर झाला आहे.
६ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता श्रीमहागणपति घाटावर शिवप्रतापदिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते ‘वीर जीवा महाले पुरस्कार’ आणि मानाचे कडे पुणे शहराचे माजी महापौर श्री. सुरेश नाशिककर यांना देण्यात येणार आहे, तसेच ‘अधिवक्ता पंताजीकाका बोकील पुरस्कार’ हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांना देण्यात येईल. आतापर्यंत सोलापूर येथील अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी अगत्याने उपस्थित राहून त्यांचे धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment