संभाजी ब्रिगेेडच्या राजकीय पक्षस्थापना दिनाच्या
कार्यक्रमात देव, धर्म आणि ब्राह्मण यांच्यावर विद्वेषी टीका !
मुंबई- संभाजी ब्रिगेडने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय आतंकवादाचे उच्चाटन करण्यासाठी लढा दिला. जेम्स लेन आणि भांडारकर यांनी शिवाजी महाराजांवर टीका केली. हा सांस्कृतिक आतंकवाद होता. त्या वेळी त्याच्या विरोधात केवळ संभाजी ब्रिगेडच पुढे आली. ज्या व्यक्तीने दंगलीचा इतिहास लिहिला, अशा व्यक्तीला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. ४ थी च्या पाठ्यपुस्तकात दादाजी कोंडदेव यांचा विकृत इतिहास देण्यात आला. संभाजी ब्रिगेड सत्तेत आल्यानंतर पाठ्यपुस्तकात सत्य विचारधारा आणि संविधानकेंद्रीत अभ्यासक्रम देण्यात येईल, तसेच ‘केजी’ ते ‘पीजी’ शिक्षण मोफत करण्यात येईल. यासाठी धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करून शिर्डी देवस्थानचा पैसा उपयोगात आणला जाईल, असे ब्राह्मणद्वेषी आणि धर्मद्वेषी वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केले.वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संभाजी ब्रिगेडची राजकीय पक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ता गंगाधर बनबरे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात पक्षाचा राजकीय अजेंडा सांगतांना देव, धर्म आणि ब्राह्मण यांच्यावर अश्लाघ्य टीका करण्यात आली. या कार्यक्रमाच्या ठिकाणी हिंदु आणि ब्राह्मण द्वेषी पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.
नेमके कोणत्या धार्मिक स्थळांचे राष्ट्रीयीकरण करून त्यांचा पैसा उपयोगात आणल्या जाईल हिंदू धर्मातील धार्मिक स्थळांचा कि इतरांचा
कार्यक्रमात वक्त्यांनी देव, धर्म आणि ब्राह्मण यांच्याविरुद्ध केलेली विकृत वक्तव्ये
१. देवाची दारू, धर्माचा गांजा आणि जातीची नशा यामध्ये लोकशाही उद्ध्वस्त केली आहे !
२. आम्हाला हिंदुत्व मान्य आहे; पण महात्मा फुले, शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व मान्य आहे. हिंदुत्व उणे (-) ब्राह्मण बरोबर (=) जे उरेल ते आमचे आहे.
३. पक्षाचा झेंडा भगवा असला, तरी हा अहिंसेचा, बुद्धाचा भगवा आहे. पेशव्यांच्या लंगोटीचा भगवा नाही.
४. देशात सांस्कृतिक आतंकवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही पक्ष छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेत आहेत. महाराजांचे नाव घेऊन जनतेला भावनिक बनवतात. यांच्या वाणीत शिवबा आहे; मात्र करणीत नाही. संभाजी बिग्रेडच्या वाणी आणि कृतीतही शिवाजी अन् जिजाऊ आहे.
गंगाधर बनबरे म्हणाले की,
१. प्रबोधनकार ठाकरे यांचे खरे वारसदार आम्ही आहोत.
२. मुंबई कुणाच्या बापाची नाही. मुंबई कुणबी, कोळी, आगरी, भंडारी हे मुंबईचे मालक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन कुणाच्या हातात मुंबई गेली आहे ? स्वराज्याच्या मावळ्यांना शिवाजीच्या नावाने मुंबईतून हद्दपार केले. आमचा भगवा बदनाम केला गेला. तो परप्रांतीय, मुसलमान आणि दलित यांच्या विरोधात वापरला गेला. प्रांत, जात आणि धर्म वाद संभाजी बिग्रेड मानत नाही.
Post a Comment