सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त पत्रकार परिषद !
Posted by
vidarbha
on
9:00:00 PM
in
सोलापूर
|
सोलापूर शहरातील ही ११ वी मोठी सभा
 |
डावीकडून सर्वश्री योगेश जोगदनकर, सिद्धराम चरकुपल्ली, बापू ढगे, सुनील घनवट, सौ. अलका व्हनमारे, सौ. विद्या कुलकर्णी, विनोद रसाळ |
सोलापूर - हिंदूंवर होणार्या अन्यायाला वाचा फोडणे, तसेच त्यांच्यात धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरणास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे या हेतूने सोलापूर येथे ४ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली. सभेनिमित्त येथील श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. विद्या कुलकर्णी, रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हासंघटक सौ. अलका व्हनमारे, माजी नगरसेवक बापू ढगे, बजरंग दलाचे योगेश जोगदनकर, श्री. सिद्धराम चरकुपल्ली, समितीचे विनोद रसाळ उपस्थित होते. श्री सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘सोलापूर शहरातील ही ११ वी मोठी सभा आहे. आतापर्यंत ११६ बैठका, १ मेळावा आणि १ सहस्र १३६ वैयक्तिक संपर्क, १४ ठिकाणी कोपरा बैठका, १६ पथनाट्ये, सामाजिक संकेतस्थळे या माध्यमातून प्रसार करण्यात आला. पंचक्रोशीतील २२ गावांत सभेची उद्घोषणा करण्यात आली.’’ माजी नगरसेवक बापू ढगे म्हणाले, ‘‘समितीला हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यात सतत यशच मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर अनेक संघटना आणि राजकारणी यांनी अपलाभ घेऊन त्याला वेगळे वळण दिले. गोहत्या, लव्ह जिहाद, भूमी जिहाद याविषयी समितीला यश प्राप्त झाले आहे, या सभेला आमचा पाठिंबा आहे.’’
सनातन संस्थेच्या प्रसारसेविका सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, रणरागिणी शाखेच्या सोलापूर जिल्हा संघटक सौ. अलका व्हनमारे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट, वारकरी संप्रदायचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे हे सभेला वक्ते म्हणून लाभले आहेत.
Post a Comment