भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजासिंह ठाकुर यांची तोफ आज करवीरनगरीत धडाडणार !
Posted by
vidarbha
on
6:00:00 AM
in
कोल्हापूर -
|
आज कोल्हापूर येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा !
कोल्हापूर - कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला आहे. कोपरा सभा, वैयक्तिक संपर्क, कट्टा बैठका आणि सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे. याला सर्व समाज घटकांतून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
९ डिसेंबर या दिवशी शहरात झालेल्या वाहनफेरीमुळे करवीर नगरीत भगवा उत्साह संचारला आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होत असलेल्या सभेची सिद्धता आता अंतिम चरणात पोेचली आहे.
Post a Comment