चांदूर रेल्वे- (शहेजाद खान )
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा समाजातील सर्व प्रकारच्या शोषित वंचितासाठी होता. त्यामुळे त्यांना विशिष्ट चौकटीत बंदिस्त करणे त्यांच्यावर अन्यायकारकच होय, असे प्रतिपादन प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी कला व विज्ञान महाविद्यालय, कुर्हा येथे व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाव्दारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. जोपयर्ंत आपण आपल्या महापरुषांचा विचार जाती, धर्म, वंशाच्या चष्म्यातून करू तोपर्यंत त्यांच्या उदान्त कार्याचे मूल्यमापन होऊच शकत नाही, कोणत्याही कारणाने कोणत्याही महापुरुषांवर फुली मारून पुढे जाणे भयावह आहे. जिथे जे जे चांगले ते ते स्वीकारण्याची मानसिकता आपला भविष्यकाळ उजवून टाकू शकतो, असे स्पष्टीकरण प्रा. तेलंग यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ज्ञानपिपासू वृत्ती आणि त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. सांस्कृतिक विभागाच्या डॉ. नीशा जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य या विद्यार्थिनीने केले. डॉ. प्रा. वीभा देशपांडे, प्रा. किशोर ताकसांडे, प्रा. अभ्यंकर, प्रा. कीर्ती गांधी यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात होती.

Post a Comment