BREAKING NEWS

Sunday, December 11, 2016

मुंबईतील आरे कॉलनीमध्ये हेलिकॉप्टरला अपघात

विशेष प्रतिनिधी /शहेजाद खान -

मुंबईमधील आरे वसाहत मध्ये
हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. आरे रॉयल पाम सोसायटीमध्ये हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरने पेट घेतला. या अपघातात हेलिकॉप्टरमधील चार जण जखमी झाले. यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. अग्नीशमन दलाकडून हेलिकॉप्टरला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. रॉबिन्सन आर ४४ हे हेलिकॉप्टर गोरेगावमधील आरे कॉलनी भागात कोसळले. यानंतर या हेलिकॉप्टरने अचानक पेट घेतला. अपघातातील जखमींना उपचारांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॉबिन्सन आर ४४ हेलिकॉप्टर आधी पवन हंसच्या ताफ्यात होते. यानंतर एका खासगी कंपनीला या हेलिकॉप्टरची विक्री करण्यात आली. यानंतर या विमानाचा वापर खासगीउड्डाणासाठी करण्यात येत होता.क्लचमध्ये बिघाड झाल्याने एमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न फसल्याने हा अपघात झाला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.