
मुंबई - येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांची युती असो अथवा नसो मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकणार, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख यांच्या बैठकीत श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईचा भावी महापौर शिवसेनेचाच असेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनीही एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत व्यक्त केला
Post a Comment