शेकडो महीला, शेतकरी, शेतमजुंराची उपस्थिती
चांदूर रेल्वे- (शहेजाद खान )
श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, अपंग निराधार योजनेची पेन्शन ६०० रुपयांवरुन १००० रुपये करा या मागणीकरीता स्थानिक जनता दल (सेक्युलर) तर्फे तहसिल कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष महा. राज्य तथा माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले यांनी केले. यावेळी शेकडो महिला, शेतकरी, शेतमजुंराची प्रामुख्याने उपस्थीती होती.
सदर मोर्चा सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी आठवडी बाजार, चांदूर रेल्वे येथून दुपारी १२ वाजता निघुन तहसिल कार्यालयावर पोहचला होता. या मोर्चाचे नेतृत्व जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. पांडुरंग ढोले व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गजानन ससनकर यांनी केले. या मोर्चामध्ये आठ वर्षापासून श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, अपंग निराधार योजनेंतर्गत अनुदानाची रक्कम वाढली नाही. दरम्यान अधिकारी, कर्मचारी व आमदार, खासदारांची पेन्शन दुप्पट झाली. अनुदान मिळण्यासाठी महागाई नाही काय ? म्हणून दोन्ही घटकांचे अनुदान वाढवून कमीत कमी १००० रुपये करावे, शेतकर्यांच्या शेतमालाला भाव नाही. शेतकर्यांचे कर्ज माफ झाले नाही. शेतमालाचे भाव सरकार स्थिर ठेवू शकत नाही. म्हणून शेतकरी, शेतमजुरांना दरमहा २००० रुपये पेन्शन मिळावी, केरळ, गोवा, पश्चिम बंगाल, पंजाब या राज्यामध्ये शेतकरी शेतमजुरांना पेन्शन मिळते मग महाराष्ट्रात का नाही? श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना, अपंग निराधार योजनेचे पेन्शन ६०० रुपयेवरुन १००० रुपये करावी. शेतकरी, शेतमालाच्या भावासाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी या मागण्यांचा समावेश होता. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले..
मोर्चामध्ये जनता दलाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती छायाताई झाडे, अैड. सुनिताताई भगत, तालुका अध्यक्ष धरमराज वरघट, युवा जनता दल जिल्हाध्यक्ष अवधुत सोनोने, अशोकराव रोडगे, दादाराव डोंगरे, अंबादास हरणे, सुधिर सव्वालाखे, प्रमोद बिजवे, शंकरराव आंबटकर, डॉ. पडोळे, अर्जुन कळंबे, दिलीपराव राऊत, संजय डगवार, रामराव गाढवे, दिलीप गाढवे यांसह शेकडो महिला निराधार लाभार्थी, शेतकरी, शेतमजुर प्रामुख्याने उपस्थित होते..
Post a Comment