चांदूर रेल्वे / शहेजाद खान /--
येथील छ.शिवाजी महाराज न.प.शाळेने ‘दप्तर मुक्त शाळा ‘हा उपक्रम राबविला असुन वर्गशिक्षिका कविता कटकतलवारे यांनी विविध उपक्रम विषयवार राबवुन पहिला वर्ग दप्तरमुक्त केला.या उपक्रमामुळे विद्यार्थी मोठ्या आनंदाने शिक्षण घेत असुन पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
वर्ग शिक्षिका कविता कटकतलवारे यांनी पहिल्या वर्गाचे भाषा विषयासाठी श्रवण,भाषण, वाचन व संभाषण,लेखन,अभिव्यक्ती चा वापर करून पाठ्यपुस्तकातील कविता भ्रमणध्वनी व छोटा स्पिकरचा वापर करून शिकविले. कविता शिकवितांना अभिनय व प्रात्यक्षिकाची जोड दिल्यामुळे विद्याथ्र्यांनी कविता लवकर आत्मसात केल्या. लेखन साहित्य खडु, लेखन, पेन्सिल, खोड रबर या वस्तुची बँक बनविली. विद्याथ्र्यांना लेखनाची गरज पडली की या बँकेतुन लेखन साहित्य वापरू लागली. त्यामुळे पेन्सिल तोंडात टाकणे, चावणे, खाणे, लेखन नाकात टाकणे, खोड-रबर घासणे, वस्तु दप्तरात न दिसणे या वाईट सवयींना आळा बसला. गटनिहाय संवादाचे नाट्यीकरणात मुखवट्याचा वापर केला. या संवाद व गोष्टीमधे विद्यार्थी आनंदाने सहभागी होऊ लागले. गटागटाच्या माध्यमातुन अक्षराचे, शब्दांचे हवेत लेखन करणे, माझी पाटीवर लेखन, मैदानावर धुळीत लेखन करून घेतले, नवनित अक्षर ओळख भाग १ व २ या पुस्तकाचा लेखन सराव घेतला. गणितासाठी विविध वस्तु, चित्रे, मणी, स्ट्रा चित्रे, धान्यबियांचा वापर करून १ ते १०० अंकाची ओळख करू दिली. अंक ओळख करून देतांना अंकगाण्यासह इतर विविध पध्दतीचा उपयोग केल्याने विद्याथ्र्यांच्या स्मरणात चांगले बसले. बालपणात खेळण्याची आवड लक्षात घेवून क्रीडण पध्दत व विविध शैक्षणिक साहित्याचा वापर गणित अध्यापणासाठी केला. कला, कार्यानुभव व कागदापासुन विविध आकार विमान फुले , कान हलविणारा ससा, आकाश कंदील , कापसापासुन वाती, धागा, गोळे, मातीपासुन फळे, प्राणी, खेळभांडे, मणी, विविध कलाकृती तयार करण्याचे प्रात्याक्षिक घेतले. औषधी वनस्पतीची माहिती देण्यात आली. चिंढ्यापासुन बाहुली व बाहुलीचा खेळ, परिसर निरिक्षणातुन नक्कल करण्याच्या उपक्रमातून आजीबाईसारखे चालणे, पोळ्या लाटणे इत्यादीचा वापर केला. शब्द भंडार वाढविण्यासाठी वर्गातील भिंतीवर शब्दबाग, अक्षरबाग,स्वर चिन्हे लावुन अक्षरे, शब्द व जोडाक्षरे यांचे लेखन करून घेतले. मानवी शरीराची आकृती काढून अवयवांना इंग्रजी व मराठी नावे दिली. महिणे, त्रिकोण, चौकोन, वार व १ ते १०० अंकाचे स्पेलींग, मोबाईल मध्ये विविध अॅपचा उपयोग करून त्याचा वापर, विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या वस्तुंची प्रदर्शनी भरविणे. शाारीरिक शिक्षणात सांघिक कवायत, डंबेल, चेंडू कवायत, धावणे, विविध खेळ घेऊन विद्याथ्र्यांना आरोग्याचे धडे दिले. वाचनासाठी छोटी चित्रमय पुस्तके, शब्दकार्ड, माईड मॅप या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदाने व उत्साहाने शाळेत येऊ लागला. त्यामूळे विद्याथ्र्यांची उपस्थिती वाढली.या सर्व उपक्रमामूळे विद्याथ्र्यांच्या कला गुणांना वाव मिळाला.विद्यार्थी बोलके होऊन त्यांच्यातील कल्पकवृत्ती व कार्यकुशलतेला वाव मिळाला. विद्याथ्र्यांच्या वर्तनात बदल घडुन आला.
Post a Comment