BREAKING NEWS

Friday, December 9, 2016

हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राकडे वाटचाल ! - शरद माळी, श्रीशिवप्रतिष्ठान

  • हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या वाहनफेरीत ११५ हून अधिक दुचाकींचा उत्स्फूर्त सहभाग ! 
  • कोल्हापूर येथे ११ डिसेंबरला हिंदु धर्मजागृती सभा ! 

वाहनफेरीत सहभागी सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

        कोल्हापूर- कोल्हापूर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आजूबाजूच्या अनेक गडकोटांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य होते. या शिवरायांच्या भूमीत काही संघटना जाणीवपूर्वक हिंदु धर्म, देश, देवता यांच्यावर टीका करत आहेत; मात्र यापुढील काळात ही टीका सहन केली जाणार नाही. ही सभा म्हणजे हिंदुत्वाची डरकाळी आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र येणारच आहे, असे ठाम प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. शरद माळी यांनी केले. ते ११ डिसेंबर या दिवशी होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेरीच्या समारोप्रसंगी बोलत होते. 

मनोगत व्यक्त
करतांना श्री. शरद माळी
        या फेरीचा प्रारंभ सकाळी ११ वाजता मिरजकर तिकटी (शेषशायी विष्णु मंदिर) येथे श्री संप्रदायाचे शहरप्रमुख श्री. मारुति यादव आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुधा यादव यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून करून झाला. याचे पौरोहित्य कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित संघाच्या ब्रह्मवृंदाने केले. यानंतर शहरातील विविध मार्गांवरून जाऊन फेरीचा समारोप मिरजकर तिकटी येथे झाला. या फेरीत ११५ हून अधिक दुचाकी आणि ५ चारचाकी वाहने सहभागी झाली होती. फेरीत हिंदुत्वनिष्ठांचा सळसळता उत्साह पहावयास मिळाला. 
विशेष
१. हुपरी येथील शिवकार्य ढोलपथकाचे श्री. ओमराज उदय माळवदे हे त्यांची बुलेट दुचाकी घेऊन या फेरीत सहभागी झाले होते. 
२. श्री संप्रदायाच्या साधकांनी उपस्थितांना भगव्या टोप्या दिल्या. 


ठिकठिकाणी फेरीचे स्वागत !

१. राजारामपुरी ५ वी गल्ली येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख श्री. रघुनाथ टिपुगडे, श्री. कमलाकर किलकिले यांनी पुढाकार घेऊन फेरीचे स्वागत केले. या वेळी सौ. मंदाकिनी शिंदे, सौ. जौजाळ, सौ. कारखानीस उपस्थित होत्या. 
२. बिंदू चौक येथे शिवसेना शाखा आझाद गल्ली यांच्या वतीने फेरीचे स्वागत करण्यात आले. या वेळी सर्वश्री विराज ओतारी, प्रशांत ओतारी, अभिजित ओतारी, ऋषीकेश ओतारी, विशाल घोरपडे, सौ. साधना ओतारी, सौ. अश्‍विनी ओतारी, सौ. गीता ओतारी उपस्थित होत्या. 
३. शाहुपुरी चौथी गल्ली येथे सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रासमोर साधकांकडून ध्वजाला ओवाळून, हार घालून, तसेच पुष्पवृष्टी करून फेरीचे स्वागत करण्यात आले. 
४. फेरी संपल्यानंतर साधक मिरजकर तिकटी येथे आले. त्या वेळी तेथे असलेल्या झाडांची पाने साधकांवर पुष्पवृष्टी झाल्याप्रमाणे पडली. 
        फेरीच्या समारोपप्रसंगी बालसाधकांनी नाटिका सादर केली. यात जिजामाता, सुभाषचंद्र बोस, शिरीष कुमार, स्वा. सावरकर यांची वेषभूषा करण्यात आली होती. या नाटिकेत राष्ट्र आणि धर्म यांवर होत असलेले आघात, धर्माचरणाचे महत्त्व, क्रांतिकारकांचा त्याग यांसह अनेक गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला. या नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. 
        नाटिका पाहून दोन युवतींनी भारतीय संस्कृती समजावून सांगण्याचा हा चांगला मार्ग आहे. यामुळे आपली संस्कृती काय आहे हे कळले, अशी प्रतिक्रिया दिली. 

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.