अचलपूर :-(प्रमोद नैकेले )
चाँदूर बाजार निवासी नगर सेवक अँड. अबिद हुसेन अ रफीक हे प्रभाग क्र 6 मधून निवडून आले त्यामुळे अचलपूर मराठी पत्रकार परिषद चे प्रसिध्दी प्रमुख मो अज़हरउद्दिन व मित्रपरीवाराने तेथे जाऊन त्यांचा सत्कार केला. अबिद हुसेन हायकोर्ट अधिवक्ता असून अमरावती जिल्ह्यातील सर्व नगर पालिका मध्ये निवडुन आलेल्या अल्पसंख्यक नगर सेवकामध्ये सर्वात उच्च शिक्षित आहेत.त्यांनी इंग्रजी मध्ये एम.ए.एम एस सी एल एल बी.पर्यंत शिक्षण प्राप्त केले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की समाज मध्ये शैक्षणिक विकास ला महत्व देतील तसेच प्रभागासोबत शहराच्या विकासासाठी प्रयत्न करतील. सत्कार करतांना पत्रकार मो अज़हरउद्दिन,.ताबिश अतहर,डाँ. सै शरीफ़ ,अफाक हैदर,मो इमरानोदीन, अज़गर खान,कामरानोद्दिन,डाँ. तारिक ,.मुजाहिद खान सर,सजिद खान ,.काज़ि कलिमसर, काज़ी फैसल. यांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment