शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे यांचा उपस्थितीत करार
अमरावती-
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व इंडिया स्टडी सेंटर, स्कूल ऑफ एशियन स्टडीज, युनिव्हिसिटी कॉलेज कॉर्क (युसीसी) नॅशनल युनिव्हिसिटी ऑफ आर्यंलँड कॉर्क, आर्यंलड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मेळघाटच्या शैक्षणिक विकासासाठी हा करार महत्वपूर्ण ठरणार आहे. वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला ना. श्री विनोदजी तायडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, श्री. सितारामजी कुंटे, प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. नामदेव कल्याणकर, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. अमरजीव लोचन, इंडिया स्टडी सेंटर युसीसी, आर्यंलँडचे भारतातील प्रतिनिधी डॉ. अपूर्वा पालकर, समन्वयक, टास्क फोर्स, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख, डॉ. सुनेत्रा महाराज पाटील, संचालक वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर, डॉ. राजेश जयपूरकर, संचालक महाविद्यालय व विद्यायापीठ विकास मंडळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि इतर मान्यवर उपसस्थित होते.

ना. श्री विनोदजी तावडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार करणे ही काळाजी गरज असून आधूनिक जगामध्ये निरंतर होणारे बदल आपल्या येथील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करायला हवे. याशिवाय त्यांनाही उच्च शिक्षण प्राप्त करणाकरीता विदेशामधे पाठविले पाहीजे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व आर्यंलड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातूनच ते पूर्ण होवू शकते. तसेच आर्यंलॅड येथील शिक्षक संशोधक व विद्यार्थी ह्रांना मेळघाट सारख्या भागामध्ये संशोधन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य कराराचा माध्यमातून दोन्ही देशांच्या विभिन्न संस्कृतीचे आदानप्रदान होणार आहे.
मेळघाटमधील विद्याथ्र्यासाठी उच्च शिक्षणातून रोजागाराच्या संधी निर्माण होण्यासाठी पर्यावरण पुरक व स्थानीक रोजगार निर्मितीचे अभ्यासक्रम विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू झाल्यास मेळघाट मधील नवयुकांना शिक्षणाकडे आकर्षित करणे सोयीचे होईल. तसेच वनसंरक्षण, वनउपजावरील आधारीत प्रक्रीया उद्योग सुरू झाल्यास स्थानीक रोजगार निर्मिती होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मेळघाटातील शैक्षणिक दर्जा सुधारणे तसेच शिक्षणविषयी आवड निर्माण होऊन त्यांची नियमितता निर्माण करणे हे प्रमुख उद्देश्य आहे. अंधश्रद्धा निर्मुलन, कुपोषन निर्मुलन, आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी रोजगार या सर्वांकरिता शिक्षण हे प्रभावी माध्यम असल्याचा आस्था व विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर परिवर्तन करुन समाज विकास साधता येईल. यासाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या या पुढाकाराद्वारे मेळघाटमधील विविध समस्यांचे निराकरण करुन अपेक्षित समाज विकास करणे शक्य होईल.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला कुलगुरू, डॉ. मुरलीधर, चांदेकर, हयांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सदर सामंजस्य कराराव्दारे मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागामध्ये उच्च शिक्षणाच्या संधी मोठया प्रमाणावर निर्माण होणार असून, त्याद्वारे तेथील खालावलेले आर्थिक, सामाजिक जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. सदर सामंजस्य कराराच्या माध्यमातुन आपल्या येथील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व इतरांना आर्यंलँड येथे जाण्याची संधी उपलब्ध होणार असून उच्च शिक्षणाचे नवीन दालन त्यांना उपलब्ध होणार आहे.
सदर सामंजस्य करारावर प्रा. अमरजीव लोचन, युसीसी, आर्यलँड चे भारतातील प्रतिनिधी व डॉ. अजय देशमुख, कुलसचिव, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हयांनी स्वाक्षरी केल्यानंतर एकमेकांना कराराचे आदानप्रदान करण्यात आले. जीवतंत्रशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉ. अनिता पाटील हयांनी मंचावरील मान्यवरांचा परिचय, संचालन करून सर्वांचे आभार मानले. यावेळी आयक्युएसी चे संचालक डॉ.एस.एफ.आर. खाद्री, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद अस्वार, डॉ. प्रसाद वाडेगांवकर, डॉ. के. बी. नायक, उपकुलसचिव विकास श्री मंगेश वरखेडे व विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.
पदवीधर विद्याथ्र्यांसाठी विद्यापीठात कॅम्पस इन्टरव्ह्रुव्हचे आयोजन
विद्यापीठांतर्गंत 2010 नंतर विविध विद्याशाखांमध्ये आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या विद्याथ्र्यांना यात सहभागी होता येणार आहेत. विद्याथ्र्यांना कंपनी मार्फत करिअर घडविण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने विद्यार्थी कल्याण विभागाने या मुलाखतीचे आयोजन केले आहे. या मुलाखतीसाठी सहभागी होऊ इच्छिणा-या विद्याथ्र्यांनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ईमेलवर आपले संपूर्ण परिचय पत्र (बायोडाटा) पीडीएफ फाईलच्या स्वरूपात 13 डिसेंबरपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. वेळेवर कुठल्याही विद्याथ्र्यांची नव्याने नोंदणी केली जाणार नाही. असे विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या मुलाखतीसाठी सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, बी.बी.ए. अथवा एम.बी.ए. या विद्याशाखांचा पदवीधर असणे आवश्यक असून त्याने पदवी परीक्षेत 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले असावेत. मुलाखतीच्या वेळी विद्याथ्र्यांला त्याच्या परिचय पत्राच्या दोन सत्यप्रती आणणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला येतांना विद्याथ्र्यांचा पोशाख देखील फॉर्मल असणे अपेक्षित आहे. त्याच प्रमाणे विद्याथ्र्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान व संवाद कौशल्य असणे आवश्यक असून उत्तम संवाद कौशल्य असणा-या विद्याथ्र्याला मुलाखतीत प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. गणेश मालटे यांनी सांगितले
Post a Comment