BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

झी युवा " शौर्य गाथा अभिमानाची " चौथी गोष्ट - शौर्य निडर महिला पोलीस अधिकाऱ्यांचे

अनिल चौधरी : 
पुणे /--










      "शौर्य - गाथा अभिमानाचीया मालिकेची पुढची गोष्ट आहे महिला पोलीस अधिकारी श्रीमती हिरेमठ मॅडम आणि निडर मृदुला लाड यांची . याशूर महिला पोलीस अधिकारी ,  स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता , अत्यंत निडरतेने आणि कल्पकतेने अट्टल कुविख्यात खंडणीबहाद्दरांना एकट्यानेच  भिडल्याआणि जेरबंदही केले


अश्या प्रकारची केस सोडवताना त्यांची प्लॅनिंग आणि कामाच्या कक्षेच्या चाकोरीबाहेर जाऊन केलेलं शौर्य गौरवणीय आहे . ज्या प्रमाणे महाराष्ट्रपोलिसांमध्ये पुरुष पोलीस पूर्ण मेहनतीने काम करताततेवढ्याच मेहनतीने महिला पोलीस सुद्धा त्यांचे  कर्तव्य बजावत असतातअनेक महिला पोलीस , अत्यंतकर्तबगारीने , त्यांचं कुटुंब सांभाळून , जनतेच्या सुरक्षेसाठी झटत असतात . 


पोलीस दलात महिला पोलिसांची नितांत गरज या साठीही आहे कारण अनेक महिलातक्रारदार पुरुष अधिकाऱ्यांसमोर स्वतःची व्यथा नीट मांडू शकत नाहीत . तेव्हा अश्या महिला अधिकाऱ्यांचे केवळ असणेही बरंच काही करून जाते . महिला पोलीसनिडरतेने गुन्हेगारांशी एक एक हात ही  करतात आणि काही नाजूक केसेसचे सामंजस्याने निराकरणही ही करतात . अश्या महिला अधिकाऱ्यांमध्ये दोन  महत्वपूर्ण  नाव आहेत  हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांची . हिरेमठ मॅडम  यांना क्राईम ब्रांच  मध्ये पहिल्या  महिला डिटेक्शन अधिकारी असण्याचा मान आहे . तर मृदुलालाड  याना स्वातंत्र्यानंतर पहिले पोलीस राष्ट्रपती शौर्य पदक  मिळण्याचा मान आहे . तसेच पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या महिलांच्या पहिल्या बॅच मधील त्यापोलीस अधिकारी आहेत .  त्यांनी अनेक केसेस पुरुष अधिकारांच्या खांद्याला खांदा लावून सोडवल्या आहेतया दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांनी सोडवलेल्याअनेक केस मधील महत्वाच्या  दोन केसेस  या शुक्रवारी १६ डिसेंबर हिरेमठ मॅडम आणि शनिवारी १७ डिसेंबर मृदुला लाड , रात्री  वाजता,  झी युवावर या  "शौर्य -गाथा अभिमानाचीया कार्यक्रमाद्वारे पाहायला मिळतील



१९९६ मध्ये हिरेमठ मॅडम यांचीक्राईम ब्रांच मध्ये पहिली महिला डिटेक्शन अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती . त्या वेळी रॉनी मेंडोसा हे पोलीस आयुक्तहोतेएक "तंजोर आर्ट पेंटिंग"या व्यवसायातील एक गर्भ श्रीमंत बाईने तिला खंडणीसाठी येणाऱ्या धमक्यांची तक्रार नोंदवली आणि हि केस  हिरेमठ मॅडम यांच्याकडेआलीहिरेमठ मॅडम यांनी हि केस सोडवण्यासाठी अनेक बाबींचा विचार केलाया कार्यक्रमात आपल्याला हिरेमठ मॅडम या चाकोरीबाहेर जाऊन कल्पकतेने त्याखंडणीखोरपर्यंत कश्या पोहोचल्या आणि कश्या प्रकारे त्यांनी त्याला भर रस्त्यात खंडणी खोराबरोबर हातापायी करूनचालत्या वाहनातून अक्षरशः खेचून बाहेर काढलेआणि जेरबंद केलेयाची हि अतिशय रंजक अशी गोष्ट आहेतर मृदुला लाड यांनीनकळत भाग होत गेलेल्या गुन्हेगाराच्या पाठलागामध्येअतिशय नीडरतेनेलढतानातेव्हाचा कुविख्यात खंडणीखोर “डी के राव” सारख्या गुन्हेगाराला बंदुकीच्या गोळीबारात जायबंदी केले . डी . के राव ज्याला अनेक मोठमोठाले बिल्डर्स सुद्धाघाबरायचे अश्या मोठ्या गुंडाला आपल्या जीवाची पर्वा  करता , एका शूर महिलेने आमने  सामने गोळीबार करत निडरपणे सामना केला आणि अतुलनीय शौर्यदाखवले.



आजच्या धकाधकीच्या जीवनात ही स्त्रियांना समाजात आपले असे वेगळे स्थान करण्यासाठी बरेच परिश्रम करावे लागत आहे आणि ह्या परिश्रमात ती कूठेही कमी पडलेली नाही जिद्दीने पुढे जात आहे महिला हल्ली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. अगदी महिला जगतापासून ते पुरुष जगापर्यंत म्हणजे असे कि जिथे आधी पुरुष पारंगत असायचा तिथे त्यांच्या जागेवर महिला काम करू लागल्या आहेत महिलांनी आपले क्षेत्र (स्त्रि धर्म) न सोडता अतिशय नेटाने त्या त्यांचं काम करीत असतात. प्रत्येक काम करत असताना महिलांची दृष्टी हि व्यापक असते.  पोलीस क्षेत्रात वावरताना, पुरुषांची मक्तेदारी तोडत; कुठेही कमी ना पडता, हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांनी अश्या केसेस अत्यंत यशस्वी प्रकारे सोडवल्या. महिला पोलिसांचे अतुलनीय शौर्य आपल्याला झी युवावर तसेच्या तसे, हिरेमठ मॅडम आणि मृदुला लाड यांच्या स्वतःच्या अनुभवांसकट पहायला मिळणार आहे.



या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजयताम्हाणेकलादिग्दर्शक विवेक देशपांडेछायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.