●●●●●●●◆●●●●●●●
*मोबाईल टू मोबाईल कैशलेस झाला व्यवहार*
■■■■■■■■■■
संदीप बाजड / नागपूर /--
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डिजिटल इंडियाला साकार करण्याच्या दुष्टीने संपूर्ण राज्यासह देशातील चलन व्यवहार हा कैशलेस पद्धतीने चालावा याकरिता नवीन – नवीन पद्धतीचा तंत्रज्ञानाचा होत आहे. आपल्या हि भागातील संत्रा शेतकरी यापासून वंचित राहू नये याकरिता मोर्शी – वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या श्रेत्रातील संत्रा शेतकरी बांधवांना घेऊन अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या प्रारंभी दिवसालाच म्हणजे आज मंगळवार १३ डिसेंबर २०१६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कैशलेस व्यवहाराच्या माध्यमातून संत्रा विक्री केली. ४ किलो संत्र्याकरिता मुख्यमंत्र्यांनी स्वताच्या मोबाईल मधून आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मोबाईल मध्ये पाठविले व संत्र्यांची रक्कम अदा केली. संत्रा उत्पादक शेतकर्यांचे संत्री सुलभरित्या कैशलेस पद्धतीने खरेदी करू शकतात, व शेतकरऱ्याना श्रमाचा मोबदला मिळू शकतो. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांचा उत्साह दुगुनीत केला. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे, भंडाराचे आमदार नानाभाऊ पाटोले, काटोलचे आमदार आशिष देशमुख, शेंदूरजना घाटचे संत्रा उत्पादक ताज खान मजने खान, बाळूभाऊ मुरुमकर, प्रकाश वांदे, मोरेश्वर वानखडे, इंद्रभूषण सोंडे, मनोजभाऊ माहुलकर, मोहन खेरडे, राजेंद्र पंधरे, अन्सार भाई, इब्राहीम खा, डॉ. अमोल कोहळे, किशोर भगत, जगदीश पापळकर यांच्यासह वरुड – मोर्शी परिसरातील संत्रा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
Post a Comment