चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)-
गेल्या ९ वर्षांपुर्वी तालुक्यातील घुईखेड या गावासह ८ गावाचे बेंबळा प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेले आहे. नवीन पुनर्वसन गावठाणमध्यै असलेल्या अपुऱ्या नागरी सोई सुविधांमुळे घुईखेड पुनर्वसन समस्याग्रस्त बनले असतांना धामक गावचे बेंबळा प्रकल्प योजनेंतर्गत शंभर टक्के पुनर्वसन होवून धामक हे आदर्श गाव बनवण्याचे प्रयत्न सरकारचे सुरू आहे. ९ वर्षांपासुन पुनर्वसन झाल्यानंतर नशिबाला दोष देत जगत असलेले घुईखेडवासी अनेक समस्यांचा सामना करीत असुन धामक हे गाव पुनर्वसनानंतर खरच आदर्श गाव बनणार का याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहे..
यवतमाळ जिल्ह्यातील बांधण्यात आलेल्या बेंबळा प्रकल्पामध्ये अमरावती जिल्ह्यातील घुईखेडसह ८ गावांचा समावेश आहे. गावातील नागरी सुविधा ह्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. रस्ते, नाल्या, रपटे, कॉर्नर पूल, पाण्याची पाईपलाईन, स्टैंडपोस्ट पाण्याच्या दोन्ही टाकी, इलेक्ट्रीक लाईनसह सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असल्याची ओरड गावात होत आहे. अनियमीत पाणीपुरवठा व वारंवार विद्युत खंडीत होणे नेहमीची बाब झाली आहे. नविन गावठाणमध्ये टाकण्यात आलेल्या ले- आऊटमध्ये कुठेही गार्डन, मुलांना खेळण्यसाठी प्ले ग्राऊंड, आठवडी बाजारासाठी जागा तसेच स्मशानभूमीसाठी जागा नसल्यानेही गावातील नागरीकांत असंतोष निर्माण झाला आहे. घुईखेडसह आठ गावे अमरावती जिल्ह्यातील असुन यावर यंत्रणा मात्र यवतमाळ जिल्ह्यातील आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील या गावांकडे यंत्रणेचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. असे असतांना घुईखेड गाव वाऱ्यावर सोडुन सरकारतर्फे धामक हे गाव आदर्श बनविण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. अठरा वर्षानंतर धामक गावचे बेंबळा प्रकल्प योजनेंतर्गत शंभर टक्के पुनर्वसन होणार अाहे. गावच्या पुनर्वसनाच्या भुमिपुजनासाठी खुद्द मुख्यमंत्री देंवेंद्र फडणविस येणार असल्याचे समजते.
आधीच पुनर्वसन झालेल्या गावांची समस्या अत्यंत बिकट असुन आता पुन्हा धामक गावचे पुनर्वसन करून आदर्श बनविण्याचे स्वप्न आहे. मात्र घुईखेड या गावाची स्थिती पाहता खरच धामक हे गाव पुनर्वसनानंतर आदर्श बनणार का याविषयी विविध चर्चा सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे यावरून अजब सरकारचे गजब धोरण असे म्हणण्याची वेळ आली आहे.
Tuesday, December 27, 2016
धामक बनणार आदर्श गाव, तर घुईखेड बनले आहे समस्याग्रस्त गाव - अजब सरकारचे गजब धोरण - व्यथा पुनर्वसीत घुईखेडवासीयांच्या
Posted by vidarbha on 2:30:00 PM in चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment