BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

हिंदु राष्ट्र’ हाच विश्‍वासाठी आशेचा किरण ! - श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

४ सहस्र ४३४ हिंदूंनी अनुभवली ऑनलाईन सभा !
नालासोपारा (जिल्हा पालघर) येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती !


श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल
     नालासोपारा (जिल्हा पालघर) -आज ‘इसिस’च्या माध्यमातून इस्लामी आतंकवादाचा संपूर्ण जगाला धोका आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हाच विश्‍वासाठी आशेचा किरण आहे. सहस्रो वर्षांचा इतिहास सांगतो की, हिंदू हा सामर्थ्यशाली असतांनाही त्याने कधीही कोणावर स्वत:हून आक्रमण केले नाही; कारण विस्तारवाद हा हिंदूंचा स्वभाव नसून साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे हा हिंदूंचा स्वभावधर्म आहे. आज मात्र हिंदूंच्या या मूलभूत अधिकारावरच संकट आले आहे. आज ‘लिव्ह इन् रिलेशनशिप’, समलैंगिकता, हिंदूंच्या सणांच्या विरोधातील याचिका यांवर त्वरित निकाल देण्यात येतात; मात्र हिंदु संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांवरील खटले वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवले जातात. हे सर्व रोखण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि हिंदूंनी त्यासाठी संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते.
सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू
     नालासोपारा आणि वसई या परिसरात होत असलेले हिंदूंचे धर्मांतर, हिंदु महिला अन् युवती यांवरील अत्याचार, ‘लव्ह जिहाद’, गुन्हेगारी, आतंकवादाचा धोका आदी विविध समस्यांमुळे येथील हिंदू ग्रासलेले आहेत. हिंदु बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि हिंदूंना संघटित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नालासोपारा येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आलेे होते. पालघर जिल्ह्यातील तिसरी हिंदु धर्मजागृती सभा विद्या वारिधी महाविद्यालयाच्या पटांगणात ११ डिसेंबर या दिवशी पार पडली. या धर्मसभेत ‘सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर या वक्त्यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना संबोधित करून त्यांच्यातील धर्मतेज जागवले. या सभेला सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. 
    या वेळी विद्या वारिधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एस्.पी. सिंह आणि अवधूत भगवान राम विद्यालयाचे संस्थापक श्री. सुरेंद्र यादव हे मान्यवरही उपस्थित होते. सभेत श्री बजरंग सेवा दल, योग वेदांत समिती, हिंदु गोवंश रक्षा समिती, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह ४०० धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. ४ सहस्र ४३४ जणांपर्यंत फेसबूकच्या माध्यमातून सभेचा विषय पोचवण्यात आला. धर्मसभेचा प्रारंभ शंखनाद, वेदमंत्रपठण आणि दीपप्रज्वलन यांनी झाला. सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी दीपप्रज्वलन केले. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत वैती यांनी उपस्थितांना समितीच्या कार्याची ओळख करून दिली. सूत्रसंचालन श्री. दिप्तेश पाटील यांनी केले

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.