BREAKING NEWS

Friday, December 23, 2016

महाराष्ट्र कुणबी युवा परिषद कोकणात खेड येथे २४ व २५ डिसेंबर रोजी.



जागतिक बदलाचे भान ठेवून कुणबी समाजातील युवा पिढी नव्या प्रबोधनवादी विचाराने प्रेरित झाली असून, समाजाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे. भारतीय संविधान, ओबीसी आरक्षण, कुणबी परंपरा, पीठिका व वैज्ञानिक दृष्टीकोण समोर ठेवून प्रथमच राज्य स्तरीय कुणबी युवा परिषद, कोकण येथील खेड तालुक्यात दि. २४ व २५ डिसेंबर २०१६ रोजी, सुकिवली कृषी विद्यापीठ, जिल्हा रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. या परिषदेचे अध्यक्षपद कुणबी युवाचे अध्यक्ष माधव कांबळे हे भूषवणार असून, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोंकण सह संपूर्ण महाराष्ट्रातील युवा मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
चला जगण्याची दिशा बदलूया...ह्या ब्रीदवाक्यातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम युवा पिढीने स्वीकारले आहे. जग ज्या गतीने आपली प्रगती करीत आहे त्या गतीने मात्र आपल्या समाजाची प्रगती होताना दिसत नाही याची जाणीव शिकलेल्या तरुणांना झाली आहे. आजही कुणबी समाज हा परंपरा, पीठिका, अंधश्रद्धा, व अज्ञान अशा गोष्टीत अडकला आहे. समाजात आजही मोठ्या प्रमाणात मनुवादी विचारसरणीचा पडघा प्रचंड आहे. याचा मोठा अडथला समाज सुधारणेत होत आला आहे. म्हणूनच या परिषद मध्ये समाजाला पूरक व प्रगतीपथावर घेवून जाणारे ठराव करण्यात येणार आहेत. संपूर्ण राज्यातून कुणबी युवा या परिषेदेला जमा होणार असून वैचारिक विचारमंथन करण्यात येणार आहे. प्रबोधन, शिक्षण, रोजगार, साहित्य, वैद्यकीय, व्यवसाय, लोककला व संस्कृती, आधुनिक शेती, जमीन कुळकायदा, ओबीसी आरक्षण ह्या विषयांवर दोन दिवस विचार मंथन होणार आहे.
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, हि मातृ संस्था १९२० सालापासून समाजात जनजागृती व हक्क, अधिकारासाठी काम करीत आहे, याच संघटनेची कुणबी युवा मुंबई हि युवकांची विंग १९६५ पासून कार्यरत आहे. भारत देश हा पुढील काळात युवांचा देश म्हणून ओळखला जाणार आहे आणि त्या युवांच्या देशात शेतकरी, कष्टकरी वर्गातील युवा हि दिसयला हवा...जगायला व टिकायला हवा म्हणून हि विचारांची पेरणी आहे आणि या पेरणीला सर्व युवक-युवती, समाज बांधव यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा सेक्रेटरी सुनील गावडे यांनी केले आहे.

Share this:

4 comments :

  1. ग्रेट आणि भारतीय समाजाला उपयुक्त परिषद...आपले विदर्भ news ग्रेट आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत आहत...धन्यवाद पूर्ण टीम चे..!

    ReplyDelete
  2. नक्कीच सर आता परिवर्तनशील युवा पिढी घडत आहे. आपल्या कुणबी युवा परिषद चा कुणबी युवापिढीसाठी नक्कीच उपयोग होईल.

    ReplyDelete
  3. मस्त धन्यवाद

    ReplyDelete
  4. सदर परिषद म्हणजे कुणबी युवकांना मिळालेली नवसंजीवनीच

    ReplyDelete

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.