![]() |
पत्रकार परिषदेत उपस्थित डावीकडून सौ. स्मिता
|
सांगली - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु धर्मजागृती सभा या हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण करतात. या सभेला श्रीशिवप्रतिष्ठानचा पाठिंबा आहे. तरी सांगली येथील हिंदूंनीही ११ डिसेंबर या दिवशी कोल्हापूर येथे होणार्या धर्मसभेसाठी उपस्थित राहून धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. सचिन पवार यांनी केले. ते येथे कोल्हापूर येथे होत असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ही पत्रकार परिषद ९ डिसेंबर या दिवशी हरिदास भवन येथे घेण्यात आली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी खिलारे, तसेच सनातन संस्थेच्या सौ. स्मिता माईणकर उपस्थित होत्या.
Post a Comment