अनिल चौधरी / पुणे :-
कोंढवा येथील शिवनेरी नगर कडून कोंढवा गावठाणा कड़े येणाऱ्या रस्त्यावर रिक्षाच्या अपघातात पती-पत्नी आणि बहिणीचा मृत्यू तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोंढवा खुर्द येथे तीव्र उतारामुळे येथे अनेक अपघात होत असून येथील उतारावर ऑटो रिक्षा घरावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
हि धक्कादायक घटना रविवारी रात्री 10 ते साडेदहाच्या दरम्यान घडली.यातील ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हि धक्कादायक घटना रविवारी रात्री 10 ते साडेदहाच्या दरम्यान घडली.यातील ऑटो रिक्षा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात शरीफ इब्राहीम खान (वय ६४), त्यांची पत्नी फैमिदा शरीफ खान (वय ६१) व बहिण झहिरा जहीर कुरेशी (वय ६५, सर्व रा. ताळेल चौक, घोरपडी गाव, पुणे) यांचा मृत्यू झाला.
आणि रिक्षा चालक मोमीन बाबूलाल शेख (वय २२, रा. अमर रेसिडेन्सी, कोंढवा खुर्द.हा गंभीर जखमी झाला आहे.
आणि रिक्षा चालक मोमीन बाबूलाल शेख (वय २२, रा. अमर रेसिडेन्सी, कोंढवा खुर्द.हा गंभीर जखमी झाला आहे.
खान कुटुंबीय कोंढव्यातील गल्ली नं. ३ मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होता.तो कार्यक्रम आटपून घरी निघाले होते. माजी आमदार महादेव बाबर यांच्या बंगल्याजवळील उतारावरच्या रस्त्यावरून थेट रिक्षा अतुल चौगुले यांच्या घरावर जाऊन आदळली.
या अपघातात पती-पत्नी जागीच मृत्युमुखी पडले तर त्यांची बहिण झहिरा ससून रुग्णालयात घेऊन जात असताना मरण पावल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. हा रस्ता वर्दळीचा असला तरी रात्री उशिराची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती, अपघात झाला त्या ठिकाणी घरासमोर कोणी असते तर त्याच्याही जीविताला धोका झाला असता असे नागरिकांनी सांगितले.
हा भीषण ऑटो रिक्षाचा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.

रात्रीच्या अपघातानंतर अपघाताची माहिती समजताच माजी नगरसेवक भरत चौधरी हे तेथे दाखल झाले . त्यानी त्वरित मंडळाच्या कार्यकर्ते सचिन चौधरी,संजय बाबर,कुणाल कामठे ,अतुल चौगुले, अतुल चौधरी,उमेश थोरात महेश सावंत आणि इतर नागरीकांनी अपघात ग्रस्तांना रिक्षाचे बार वाकवून बाहेर काढले तसेच त्वरित 108 क्रमांवर फोन करून तातडीची रुग्नवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले . शिवसेना रुग्नवाहिकेत इतर जखमींना सत्यानंद रुग्णालयात दाखल केले आहे तेथे प्राथमिक उपचार करून सत्यानंद रुग्णालयाने पुढील उपचारासाठी ससून मधे दाखल केले आहे.
कोंढवा खुर्दच्या संत गाडगे बाबा शाळेपासून रोड शिवनेरी नगर ला हा रस्ता जोडला जातो. रस्ता चडतीचा आणि वळणाचा आहे. या उतरत्या रस्त्यावर अनेकदा रिक्षा आणि मोटारसायकलचे ब्रेक निकामी होऊन अपघात होत आहेत .प्रशासनाने उतार कमी करावा अशी मागणी या भागातल्या स्थानिक नागरिकांची केली आहे.

Post a Comment