अमरावती-
कॅशलेस सोसायटी निर्मितीसाठी विद्याथ्र्यांचा सहभाग महत्वाचा असून देशभरातील सर्व विद्याथ्र्यांनी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन यापूर्वी केंद्रीय मानव संसाधन विकासमंत्री ना.श्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी तातडीने प्रतिसाद देवून विद्यापीठामध्ये सभेचे आयोजन करून या राष्ट्रीय कार्यात सर्वांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्यानुसार आज विद्यापीठात कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. या सभेमध्ये पहिल्या टप्प्यात 14 डिसेंबर पर्यंत विद्यापीठ परिसरात शैक्षणिक विभागान्मध्ये शिकणा-या सर्व विद्याथ्र्यांची तद्वतच अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम या पाच जिल्ह्रांत शिकणा-या सर्व विद्याथ्र्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याचे उद्धिष्ट¬ ठरविण्यात आले आहे.
विद्याथ्र्यांना सूचना की, ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धत अतिशय सोपी असून सर्वप्रथम www.mhrd.gov.in/visaka या संकेतस्थळावर जावून एनरोल व्हॉलेन्टीअर वर क्लीक केल्यानंतर स्क्रीनवर तक्ता दिसेल त्यामध्ये विद्याथ्र्यांचे नाव, शिक्षण संस्थेचे नाव, राज्य, जिल्हा, असल्यास आधार कार्डनंबर, मोबाईल नंबर, ई-मेल व पासवर्ड ही माहिती भरल्यानंतर सेव्ह करावयाचे आहे. सदर माहिती भरून झाल्यानंतर व सेव्ह केल्यानंतर प्रत्येक विद्याथ्र्याला व्हॉलेन्टीअर आयडी व युजर नेम स्क्रीन वर दिसेल. तो स्वत: जवळ नोंदवून ठेवावयाचा असून त्याची माहिती विद्याथ्र्याला आपल्या महाविद्यालयाला व विद्यापीठाला द्यावयाची आहे. नोंदणी करण्याची पद्धत अतिशय साधी व सोपी असून विद्यार्थी आपल्या मोबाईलवर सुद्धा नोंदणी 14 डिसेंबपर्यंत करू शकतात.
Post a Comment