अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक येत्या फेब्रुवारीमध्ये होवू घातली आहे. सद्या राज्यांत पदवीधर तरुण, बेरोजगारांची संख्या अधिक वाढत आहे. त्यांना रोजगार मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न होत नाही.
पदवीधर अंधकालीन कर्मचारी संघटना गेल्या सोळा वर्षापासून आपल्याला शासन सेवेत विनाशर्त सामावून घेण्याबाबत त्यासंबंधाने आपल्याला रोजगार मिळावा म्हणून शासनस्तरावर प्रयत्न व संघर्ष करीत आहे. गेल्या एप्रील २0१६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर दखल घेवून पदवीधर अंशकालीन कर्मचार्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत संघटनेच्या अध्यक्षा (राज्य) रेखाताई अहीसाव यांनी केले आहे. परंतु त्याबाबतचे आदेश देण्यात आले नाही.
सध्या अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या ३ फेब्रुवारीला होत असल्याने अमरावती जिल्ह्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेची सभा घेण्यात आली असता सभेच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा सचिव ललीता क्षिरसागर ह्या होत्या. व सभेला उपस्थित पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी होते.
सभेत अमरावती पदवीधर निवडणुकीत कुणाला मतदान करावयाचे आहे, त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती असे ठरविण्यात आले की, जो उमेदवार पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेच्या रोजगाराच्या प्रश्नावर त्वरीत निर्णय घेवून अंशकालीन कर्मचार्यांना शासन सेवेत समाविष्ट करुन घेईल, त्या उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन अमरावती जिल्हा सचिव कु. ललीता क्षिरसागर यांनी उपस्थितांना केले.
यावेळी बैठकीला ललीता क्षिरसागर, सुरेश ठाकरे, हेमंत तायडे, ललीता भोगे, शुभांगी क्षिरसागर, राजेंद्र साव, संजय खोब्रागडे, राजेंद्र कुळकर्णी, गणेश ठाकरे, अजय मोहोड, मारोटकर, शारदा राजुरकर, मंदा शेळके, रवि खरबडे, महेंद्र कथलकर, सुनील चौकडे, जयराम मेश्राम उपस्थित होते. एका पत्रकाद्वारे ललीता क्षिरसागर यांनी केले आहे.
Post a Comment