Monday, January 9, 2017
तरुण पिढीला क्रांतीकारकांच्या पराक्रमाची ओळख होणे आवश्यक – सौ. सुनीता दीक्षित, हिंदु जनजागृती समिती
Posted by vidarbha on 8:18:00 AM in माळशिरस (जिल्हा सोलापूर)– | Comments : 0
माळशिरस (जिल्हा सोलापूर)–
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांच्या छाताडावर पाय ठेवून या भूमीला हिंदवी स्वराज्य म्हणून घोषित केले. पुढे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग, राजगुरु यांसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या बलीदानामुळे भारतभूमी इंग्रजांच्या दास्यत्वातून मुक्त झाली, अशा पराक्रमी क्रांतीकारकांचे धडे इतिहासातून वगळले जात आहेत. त्यांच्या पराक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठीच निमगांव येथे ३० डिसेंबर या दिवशी येथील निमगाव विद्यामंदिर येथे फ्लेक्स प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी सौ. सुनीता दीक्षित बोलत होत्या. त्यांनी या प्रदर्शनाविषयी माहिती देऊन ३१ डिसेंबर साजरा करू नये, याविषयी प्रबोधन केले. या प्रदर्शनाचा ६०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. फलकावरील प्रबोधनात्मक लिखाण मुलांनी लिहून घेतले. शिक्षकांनाही प्रदर्शन आवडले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment