अमरावती / सुरज देवहाते /-
अमरावती विभागाचा पदवीधर निवडणूक येत्या
३ फेब्रुवारीला होणार आहे. यात आता नेमक कोण बाजी मारणार हे महत्वाचे. अमरावती
विभागात कॉंग्रेस ने ५ ही जिल्ह्यात वजन असलेला उमेदवार दिलाय म्हणजे जो विश्वास कॉंग्रेस ने श्री संजय खोडके
यांचावर ठेवलाय त्याच ते नक्कीच सोन करतील इतर जिल्ह्यात जरी श्री संजय खोडके यांची ओळख कमी असली तरी सर्वच
जिल्ह्यात त्यांचा परिचयाचे पदवीधर आहेत .त्यातच अमरावती जिल्यात कॉंग्रेस चे
आमदार श्री वीरेंद्र जगताप ,तसे तिवसा येथील यशोमती ताई ठाकूर यांची सोबत सुद्धा
श्री संजय खोडके यांना मिळेलच आताच झालेल्या नगरपालिकांचा निवडणुकीत या दोन्ही
आमदारांनी कॉंग्रेस ची लाज आपल्या मतदार संघात कायम ठेवली आहे याचाच फायदा का
होईना पदवीधर निवडणुकीत कॉंग्रेस ला नक्की होईलच. तसेच चिखली आणि बुलढाणा येथे ही
कॉंग्रेस च वर्चस्व आहे पण एकाकी अमरावतीचाच उमेदवार का हाही प्रश्न अनेकांना
आहेच.
या आधीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री रणजीत पाटील हेही भारतीय जनता
पक्षाकडून मैदानात आहेतच त्यांचाच सरकार राज्यात सत्तेवर आहेच याचाही फायदा
त्यांना होईलच पण अनेक पदवीधर हाही प्रश्न उपस्थित करित आहे कि लाखो पदवीधर राज्य
सहित विदर्भातही बेरोजगार आहेत त्यांना या निवडणुकीचा काहीही फायदा होत नाही. पण
सोबतच इतरही काही अपक्ष उमेदवार आहेतच अशातच प्रहार पक्षाचा उमेदवार देखील या
निवडणूक रिंगणात आहेच, अकोल्यातून भारिप सुद्धा आपला दमदार उमेदवार उभा करणार आहे.
शिक्षक आघाडीचा अध्यक्षा सुद्धा निवडणूक लढवायचा तयारीत आहेत. बुलढाणा येथून एक
दमदार व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र इंजिनिअर असोशियेषण चे माजी अध्यक्ष श्री
जितेंद्र जैन यानी आपल उमेदवारीचा अर्ज कालच अमरावती येथे सादर केला त्यांच यवतमाळ
वाशीम बुलढाणा येथे चांगल वर्चस्व आहे व जवळपास सगळे इंजिनियर पदवीधर त्यांचा जवळचे
आहेतच. पदवीधर मधून प्रबल दावेदार म्हणून जरी रणजीत पाटलांच नाव असेल तरी अकोल्यात
दोन महत्वपूर्ण कार्यक्रमात झालेला वादविवाद संपूर्ण विदर्भाला माहिती आहे त्यामुळे
याचा काही परिणाम पद्विधरांवर होतो का हेही तेवढा खर आहे. “वर्धमान” आणि “अरिहंत” या दो पात संस्थेचे अध्यक्ष असलेले
श्री जितेंद्र जैन यांनीही यवतमाळ वाशीम बुलढाणा जिल्हात आपली प्रतिष्टा कायम
ठेवली आहे उच्चविभूषित इंजिनिअर श्री जितेंद्र जैन यांचा सोबत आहेतच त्याच अकोला
आणि अमरावती मधील अंतर्गत राजकारणाचा ही ते फायदा घेऊ शकतात हे मात्र नक्की.
Post a Comment