चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)-
दारूच्या व्यसनांमुळे अनेक अपघात, खून, भांडणे, आत्महत्या, घरातल्यांना मारहाण इ. प्रकार होतात. घरात बायकांना मारहाण होते. अनेक नवरे दारूच्या आहारी गेलेले असतात असे आढळते. गरिबी आणि कुपोषणाच्या दुःखात दारूमुळे प्रचंड भर पडते, कारण बराच पैसा या व्यसनात खर्च होतो. समाजाच्या उत्पादकतेवरही याचा उलटा परिणाम होतोच. यासाठी शासनाच्या सर्वच स्थरावरून जनजागृतीसुध्दा करण्यात येते. तरीपण चांदुर रेल्वे शहराच्या मध्यभागात मात्र दारू विक्रीची सकाळपासुनच सुरूवात होत असल्याची बाब दिसुन येते. ही बाब स्थानिक पोलीस विभागाला माहित असुनही त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याचे विदारक सत्य उघडकीस येत आहे.
प्राप्तमाहितीनुसार, चांदुर रेल्वे शहरात असलेल्या देशी व विदेशी दारू दुकान उघडण्याच्या वेळा राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने ठरवुन दिलेल्या आहेत. मात्र चांदुर रेल्वे शहराच्या आठवडी बाजार व इतर परीसरात पहाटेपासुनच दारू विक्रीला राजरोसपणे सुरूवात होते. यासाठी खाजगी दारू विक्रेते रात्रीच त्यांना लागणारे दारू बॉक्स खरेदी करून सकाळी दारूविक्री करतात व दारू पिणारेसुध्दा घरी चहा न पिता दारूचे सेवन करतात. एकीकडे चांदुर रेल्वे शहरासह ग्रामिण परीसरातील दारू बंदी व्हावी यासाठी अनेक महिला अनेक आंदोलने करतात. मात्र दुसरीकडे पहाटेपासुनच खुलेआम दारूची विक्री होत असल्याचे चित्र पहावयास मिळते. ही बाब अबकारी विभाग व पोलीस विभागाला माहित असुनही केवळ मलीदा लाटण्यासाठी संबंधितांकडुन कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे चांदुर रेल्वे पोलीसांचा पुन्हा एक बेजबाबदारपणा समोर आला आहे. दारूच्या सेवनाने जनतेच्या आरोग्यावर कीती घातक परीणाम होतो हे संबंधितांना थोड्याशा स्वार्थासाठी दिसुन येत नाही ऐवढे मात्र खरे.
फोटो - संग्रहित
Saturday, January 14, 2017
चांदुर रेल्वे शहरात अवैद्य दारू विक्रीला आले उधान - चांदुर रेल्वे पोलीसांचे दुर्लक्ष
Posted by vidarbha on 3:47:00 PM in चांदुर रेल्वे- (शहेजाद खान)- | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment