
Saturday, January 14, 2017
आमदार नीतेश राणे यांची ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांना धमकी - (म्हणे) ‘कोकणात ‘हे राम नथुराम’ या नाटकाचे प्रयोग विचार करून करा !’
Posted by vidarbha on 8:04:00 AM in मुंबई | Comments : 0
मुंबई –
कोकणात ‘हे राम नथुराम’ या नाटकाचे प्रयोग कराल, तर विचार करून करा’, अशी धमकी काँग्रेसचे आमदार आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांना दिली आहे. या नाटकाच्या निमित्ताने श्री. शरद पोंक्षे सध्या कोकण दौर्यावर आहेत. सध्या कुडाळ, मालवण आणि कणकवली या ठिकाणी नाटकाची तिकीट विक्री थांबवण्यात आली आहे. यापूर्वी कोल्हापूर येथे संभाजी ब्रिगेडने या नाटक सादर न करण्याविषयी धमकी दिली होती; मात्र या धमकीनंतरही कोल्हापूर येथे या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. नीतेश राणे यांच्या धमकीविरोधात श्री. शरद पोंक्षे यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. पुणे येथील राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवण्याविषयीही मागील वर्षी आमदार नीतेश राणे यांनी आवाहन केले असल्याचे समोर आले होते

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment