चांदुर रेल्वे- (शहेजाद खान )
सविस्तरवृत्त असे की, प्रजासत्ताक दिनानिमित्य गुरूवारी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांच्याहस्ते स्थानिक जिल्हा परीषद शाळेत ध्वजारोहन संपन्न झाले. यानंतर पथसंचलन करण्यात आले. यामध्ये चांदुर रेल्वे पोलीसांचाही समावेश होता. पथसंचलनानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही करण्यात आले होते. हा कार्यक्रम बघण्यासाठी हजारो मुले- मुली तसेच शहरवासी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात एवढी गर्दी असतांना पोलीस सुरक्षा असणे गरजेचे होते. मात्र पथसंचलन होताच पोलीस कर्मचारी पसार झाले होते. व गोंधळ स्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगराध्यक्ष, नगरसेवक व विशेष म्हणजे एक महिला पोलीस अधिकारीही उपस्थित होत्या. त्यामुळे पोलीसांचा बेजबाबदारपणा खुद्द उपविभागीय अधिकारी यांनी डोळ्यांनी अनुभवला. या झालेल्या प्रकाराबद्दल शहरवासीयांच्या अनेक प्रतिक्रीया सोशल मिडीयावर उमटल्या. यामध्ये कर्तव्यदक्ष असलेले उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे यांच्याकडुन कारवाई ची अपेक्षा करून चांदुर रेल्वे पोलीसांना चांगलाच धडा शिकवावा असेही मत व्यक्त केले.
ग्रामिण पोलीस अधिक्षक देणार का लक्ष ?
चांदुर रेल्वे पोलीसांचा बेजबाबदारपणा एका मोठ्या अधिकाऱ्यासमोर होणे ही निंदणीय बाब आहे. या प्रकरणाकडे ग्रामिण पोलीस अधिक्षक श्री लखमी गौतम यांनीही लक्ष देणे तेवढेच महत्वाचे आहे. पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांची जिल्ह्यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन एक चांगली ओळख आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार का याकडे सुध्दा सर्वांचे लक्ष लागले आहे..
Post a Comment