पनवेल /-
महाराष्ट्रातील 27 वी महानगर पालिका म्हणुन बहुमान मिळाली पनवेल महानगर पालिका दि.01/10/2016 रोजी स्थापन झाली.महानगर पालिके मध्ये पनवेल तालुक्यामधील३२ पैकी 23 ग्रामपंचायती हस्तांतरित झाल्या आहेत. या हस्तांतरित झालेल्या 23 ग्रामपंचायती मधे 381 कर्मचारी काम करत होते.परंतू महानगर पालिका स्थापन झाल्या ते आजपर्यंत या 23 ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यारी नित्यनेमाने काम करत आहेत.सदर कर्मचाऱ्यांना 01/10/2016 ते आजपर्यंत पगार दिलेला नाही.त्यामुळे या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरात कुणी आजारी पडल्यावर त्याचा उपचार करण्यासाठी देखील या कर्मचाऱ्यांकडे पैसै नाहीत.रोजच्या गरजा भागवताना या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहे.
याच संदर्भात पनवेल महानगर पालिकेचे विद्यमान आयुक्त श्री सुधाकर शिंदे यांचाशी विचारणा केली असता टे म्हणाले कि - ग्रामपंचायती मधील कर्मचारी यांना न मिळालेल्या वेतनाबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरूच आहे काहीं ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचे गैरव्यवहार समोर येत असल्याने व ग्रामपंचायत सरपंचानी पूर्वी भरणा केलेल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांचा भारती बाबत विचार विनिमय सुरु आहे असे टे म्हणाले
Post a Comment