BREAKING NEWS

Wednesday, February 8, 2017

वसंत पंचमी निमित्त आध्यात्मिक कार्यक्रम - गायत्री परिवाराचे आयोजन; आचार्य शर्मा यांचा वाढदिवस

चांदूर रेल्वे :- (शहेजाद खान )


-

1 फेब्रुवारी वसंत पंचमी व शांतिकुंज हरिद्वार येथील गायत्री परिवाराचे सर्वेसर्वा आचार्य श्रीराम शर्मा यांच्या वाढदिवसा निमित्त  स्थानिक गायत्री परिवार तर्फे भव्य दोन दिवशीय आध्यात्मिक कार्यक्रमाचे स्थानिक दत्त मंदिरात आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पहिल्या दिवशी दिपयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते तर दुसऱ्या दिवशी एक कुण्डी यज्ञ व प्रसाद वाटपाचा कार्यक्रमाने उत्सवाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे आचार्य श्रीराम शर्मा यांच्या आध्यात्मिक कार्याबद्दल माहिती सांगण्यात आली. या वेळी आयोजन समिती गायत्री परिवाराच्या श्रीमती इंदुमती राऊत, रेखा गिरी, लताताई तीखे, सुचिता चव्हाण, निशाताई खेरकर, प्रणाली देशमुख, वंदना होले, प्रतिभा तीखे, शोभा पावसे, श्रीमती वर्मा ताई, अरुणा लंगड़े, अरुणा होले, मीणा क़ुरळकर, कांताताई होले, प्रतिभा गावंडे आदींनी प्रामुख्याने उपस्थित राहून महोत्सव साजरा केला. यावेळी परिसरातील अनेक भाविक महिला सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.