नवी मुंबई
– आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी. जिजाऊ जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांना धनुष्यबाण, भाला आणि तलवार घेऊन रणांगणावर जावे, गड-किल्ले जिंकावेत, वाघावर बसावे अशा प्रकारचे डोहाळे लागले होते. त्यामुळे त्यांच्या पोटी शिवरायांसारखा तेजस्वी, शौर्यशाली, महान असा राजा जन्मला. हल्लीच्या महिलांना मात्र स्त्री-पुरुष समानता, मंदिराच्या गाभार्यात प्रवेश हवा, तोकडी वस्त्रे परिधान करण्याची सवलत हवी. आज कोणतीही महिला मला शिवबासारखा पुत्र हवा, असे म्हणत नाही. जो पर्यंत महिलांच्या विचारसरणीत पालट होत नाही, तोपर्यंत शिवाजी महाराज जन्म घेणार नाहीत असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले. शिवचरित्रावरील व्याख्यानात ते बोलत होते. कोपरखैरणे येथील सेक्टर ७ मधील ज्ञानेश्वर माउली ओनर्स असोसिएशनच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. असोसिएशनचे नवी मुंबई समन्वयक श्री. योगेश मोरे आणि
श्री. सुरेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पहिल्यांदाच आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवानिमित्त शिवज्योत मिरवणुकीचे आणि शिवचरित्रपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्री. सुमित सागवेकर यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करण्याचे महत्त्व विशद केले.
Post a Comment